कंडोमबाबत तुम्हाला आता तुम्हाला काही माहीत नाही असं होऊ शकत नाही. पण कंडोमच्या इतिहासाबाबत अनेकांना माहिती नसते. आजच्या काळात भलेही कंडोम आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग झाला आहे. याने लैंगिक रोगांपासून बचाव तर होतोच, तसेच गर्भधारणाही टाळता येऊ शकते. अशात कंडोमचा इतिहास फार जुना आहे. चला जाणून घेऊ कंडोमबाबत आश्चर्यजनक काही गोष्टी....
असे म्हणतात की, १६व्या शतकात कंडोम जनावरांच्या आतड्यांपासून तयार केले जात होते. पण त्यावेळी त्याची किंमत खूप जास्त असायची. काही इतिहासकारांनी दावा केला की, कंडोम हे नाव डॉक्टर कंडोम नावाच्या एका व्यक्तीवरूनच ठेवलं गेलं. त्यांनीच १६ व्या शतकात राजा चार्ल्स द्वितीयला मेंढीच्या चामड्यापासून तयार केलेला कंडोम दिला होता. पण काही इतिहासकार या दुजोरा देत नाहीत.
कंडोमशी संबंधित आणखी एक किस्सा म्हणजे फ्रान्सच्या एका गुहेत एक विचित्र पेंटींग आढळली होती. ज्यात कंडोमच्या आकाराचं चित्र काढलेलं होतं. एमटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, ही पेंटींग १२ ते १५ हजार वर्षांपूर्वीची असल्याचं सांगितलं जात होतं. पण अजूनही हे स्पष्ट झालं नाही की, त्यावेळी कंडोमचा वापर गर्भधारणा रोखण्यासाठी केला जात होता की आणखी काही कारणासाठी.
कंडोमबाबतचा प्राचीन इतिहास हा थोडा अस्पष्ट नक्कीच आहे. पण १७व्या शतकात याचा वापर होता. ब्रिटनमध्ये डुडली कॅसलमध्ये झालेल्या खोदकामादरम्यान मध्ययुगीन शौचालयातून काही कंडोम मिळाले होते. हे कंडोम जनावरांपासून आणि माश्यांच्या आतड्यांपासून तयार केलेले होते. यांचा वापर साधारण १६४६ मध्ये केला असावा असा अंदाज आहे.
रबरावर प्रक्रिया करण्याचा आविष्कार चार्ल्स गुडइअर यांनी १८३९ मध्ये केला होता आणि १८४४ मध्ये पेटेंट करून घेतला होता. त्यानंतर पहिल्यांदा रबरपासून कंडोमची निर्मिती १८५५ मध्ये झाली होती. आणि १८५० च्या शेवटी रबर निर्मिती करणाऱ्या सर्व कंपन्या कंडोमची निर्मिती करू लागल्या होत्या.
२०व्या शतकात कंडोम मोठ्या मुश्कीलीने मिळत होतो. अमेरिकेत तर कंडोम वेंडिंग मशीनमध्ये ठेवले जात होते. असे म्हणतात की, १९२८ मध्ये डॉक्टरांनी लिहून दिल्यावर कंडोम मिळायचे.