शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

12 वर्षाच्या चिमुरडीने रोखला आईवर होणारा सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2017 11:11 IST

12 वर्षाच्या शूर मुलीने आपल्या आईला सामूहिक बलात्कारापासून वाचवलं असल्याची घटना समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
बरेली, दि. 3 - एका 12 वर्षाच्या शूर मुलीने आपल्या आईला सामूहिक बलात्कारापासून वाचवलं असल्याची घटना समोर आली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. आपल्या आईवर बलात्काराचा प्रयत्न होताना पाहून ही मुलगी एकटी चौघा हल्लेखोरांसोबत भिडली आणि लढा दिला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेताच सर्व हल्लेखोरांनी पळ कढाला. मुलीच्या आईला चाकू लागल्याने काही जखमा झाल्या आहेत. 
 
ही महिला आपल्या दोन मुलांसहित शेतात असताना चार जणांनी तिच्यावर हल्ला केला. 'मला जबरदस्ती जवळच्या झोपडीत घेऊन गेले आणि माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. माझी मुलगी एकटी त्यांना भिडली. त्यांनी तिला धमकावलं, मारलं पण तरीही ती मागे हटली नाही. काही वेळानंतर आमचा आवाज ऐकून गावकरी मदतीसाठी धावत आले. मात्र तोपर्यंत हल्लेखोरांनी पळ काढला होता,' अशी माहिती महिलेने दिली आहे. 
 
चौघे आरोपी एकाच गावात राहणारे असून त्यांची ओळख पटली आहे. सत्यपाल गंगवार, दिजेंद्र गंगवार, सुभाष गंगवार और जयंत गिरी अशी त्यांची नावे आहेत. कोणालाही अद्याप अटक झालेली नाही. महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी महिलेचा दावा फेटाळला असून जमिनीचा वाद असल्याचं सांगितलं आहे. 'याआधीही यांच्यात जमिनीवरुन वाद झाले असून जाणुनबुजून बलात्काराचा आरोप केला जात असल्याचं,' पोलिसांचं म्हणणं आहे.