शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीचा गोविंदा ५ वर्षांपासून कॉटवर

By admin | Updated: August 18, 2014 04:39 IST

सर्वोच्च न्यायालयाने यंदाच्या दहीहंडीला थरांच्या बंधनातून मुक्त केले असल्याने यंदाही उंच थर चढतील व दोरखंडाला लोंबकळत असलेल्या दहीहंडीला गवसणी घालण्यासाठी स्पर्धा रंगतील

भिवंडी : सर्वोच्च न्यायालयाने यंदाच्या दहीहंडीला थरांच्या बंधनातून मुक्त केले असल्याने यंदाही उंच थर चढतील व दोरखंडाला लोंबकळत असलेल्या दहीहंडीला गवसणी घालण्यासाठी स्पर्धा रंगतील. पण दहीहंडीचा दोरच तुटला तर... असाच दोर तुटून पाच वर्षांपूर्वी भिवंडीचा नागेश भोईर हा गोविंदा जायबंदी झाला. आजही तो आपल्या घरातच आयुष्याचा दोर तुटल्याप्रमाणे जीवन कंठत आहे. ‘हंडी फोडण्यासाठी ढाक्कूमाकूमच्या तालावर थरांवर चढणार असाल तर जरा धीराने घ्या. स्वत:चा जीव सांभाळा. दहीहंडीच्या थरांची स्पर्धा करू नका’, नागेश सर्वांना असे सांगत असतो. सन २००९ मध्ये ब्राह्मण आळीतील टिळक चौक मित्र मंडळाने बांधलेली दहीहंडी फोडण्यास नागेश प्रभाकर भोईर हा गौरीपाडा येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळाबरोबर गेला होता. सहाव्या थरावर चढून नागेशने ती हंडी फोडली. परंतु अचानकपणे हंडीचा दोरखंड तुटून नागेश थेट रस्त्यावर पडला. तेव्हापासून आजतागायत नागेश आपल्या पायांवर उभा राहू शकला नाही. शहरातील खाजगी दवाखान्यापासून ते मुंबईतील केईएम, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊनही अपंगत्व कायम राहिले.शहरातील मित्रांप्रमाणे सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीचे साईबाबा संस्थान, लालबागचा राजा मंडळ या संस्थांकडून आर्थिक मदत झाली. २७ वर्षांच्या नागेशला चार बहिणी आहेत. त्यापैकी एक बहीण अपंग आहे. नागेशच्या अपंगत्वामुळे आईवडिलांचा आधारच तुटला आहे. (प्रतिनिधी)