शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

सरकारी खर्चाने ब्राझील वारी

By admin | Updated: June 13, 2014 03:20 IST

साध्या साध्या गोष्टींवरून काँग्रेस पक्षावर उठसूठ टीकेची झोड उठविणाऱ्या व यापूर्वीच्या काँग्रेस सरकारवर उधळपट्टीचे आरोप करणाऱ्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज कोलांटउडी मारली

पणजी : साध्या साध्या गोष्टींवरून काँग्रेस पक्षावर उठसूठ टीकेची झोड उठविणाऱ्या व यापूर्वीच्या काँग्रेस सरकारवर उधळपट्टीचे आरोप करणाऱ्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज कोलांटउडी मारली. त्यांच्या कृपेने सहा आमदार आणि मंत्री ब्राझीलमध्ये या महिन्याच्या अखेरीस कार्निव्हल साजरा करणार आहेत. राज्याच्या भांडारात खडखडाट असताना आमदार आणि मंत्री मात्र ब्राझीलमध्ये जीवाचा गोवा करण्यास जाणार आहेत. यास विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला असला तरी पर्रीकर मात्र आपल्याच भाजप आमदारांचे, मंत्र्यांचे समर्थन करत आहेत. विशेष म्हणजे या तथाकथित अभ्यासदौऱ्यात गोव्यातील एकही खेळाडू अथवा क्रीडातज्ज्ञ नाही.क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्यासह दोन अन्य मंत्री व तीन सत्ताधारी आमदार मिळून सहाजणांना अभ्यास दौऱ्याच्या गोंडस नावाखाली सरकारी खर्चातून फुटबॉल सामने पाहण्यासाठी ब्राझीलला पाठवण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यास प्रदेश काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे. अंतिम फेरी १३ जुलै रोजी ब्राझीलमध्ये रियो येथे होणार आहे. कामत पुढे म्हणतात की, प्रादेशिक आराखडा, कॅसिनो, बेकायदा खाणींच्या प्रश्नावर २0१२च्या विधानसभा निवडणुकीत पर्रीकरांनी आश्वासने दिली होती, त्या प्रत्येक बाबतीत शब्द फिरवला. जनतेचा पैशांची उधळपट्टी न करण्याच्या आश्वासनावरही त्यांनी ‘यू टर्न’ घेतला. फुटबॉलची जाण असलेल्या व या क्षेत्रातील तीन तज्ज्ञांना पाठवले असते तर समजता येण्यासारखे होते. मात्र, सरकारने अर्जुन पुरस्कार विजेत्यांनाही डावलले. एकीकडे उपमुख्यमंत्री राज्य आर्थिक अडचणीत असल्याचे सांगतात, दुसरीकडे सरकारच अशी उधळपट्टी करते. 

मुख्यमंत्र्यांचे ‘ग्रीन कार्ड’मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या दौऱ्याचे समर्थन केले असून गोव्यात भविष्यात १७ वर्षांखालील खेळाडूंसाठी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करायचे असल्याने अनुभवासाठी आमदारांना ब्राझिलला पाठवले जात असल्याचे म्हटले आहे. आम्ही ल्युसोफोनिया स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. त्यामुळे १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धाही सहजपणे आयोजित करू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी : राष्ट्रवादी