शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या लग्नासाठी वरात घेऊन पोहोचला नवरदेव; तिथे उभी होती पहिली पत्नी, अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 16:05 IST

तरुणानं खोटं बोलून ठरवलं दुसरं लग्न; तरुणीच्या घरी वरात घेऊन पोहोचला; तिथे होती पहिली पत्नी

गोरखपूर: उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गुलरिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात वास्तव्यास असलेला तरुण वरात घेऊन घरी पोहोचला. तिथे त्याची पहिली पत्नी मुलाला घेऊन त्याची वाट पाहत बसली होती. वरात घेऊन पोहोचलेल्या नवरदेवानं पहिल्या पत्नीला आणि मुलाला पाहताच पळ काढला. त्यानंतर ग्रामस्थांनी त्याला पकडून चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी आरोपी नवरदेवाविरोधात गुन्हा दाखल असून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.

खोराबार येथील सुबाबाजार परिसरात वास्तव्यास असलेल्या बबलूनं वर्षभरापूर्वी गुलरिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या एका गावातील तरुणीशी लग्न ठरवलं. त्यानंतर ५ डिसेंबरला रात्री साडे आठ वाजता तरुणीच्या घरी वरात पोहोचली. वऱ्हाडाचं स्वागत करण्यासाठी कुटुंबीय आणि नातेवाईक उपस्थित होते. 

तिथेच नवरदेवाची पहिली पत्नी ४ वर्षांच्या मुलासह वाट पाहात होती. पहिल्या पत्नीला पाहताच नवरा पळू लागला. स्वागताला पोहोचलेल्या मंडळींनी धाव घेत त्याला पकडलं. काही तरुणांनी नवरदेवाची धुलाई केली. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी नवरदेवाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. बबलूनं ५ वर्षांपूर्वी आपल्यासोबत विवाह केला असून आम्हाला ४ वर्षांचा मुलगा असल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं.

पती दुसऱ्या महिलेशी विवाह करणार असल्याची माहिती बाहेरुन समजताच शोधाशोध करत इथपर्यंत पोहोचल्याचं पहिल्या पत्नीनं सांगितलं. त्यानंतर आरोपी पोलिसांसमोर माफी मागू लागला. आरोपी तरुणानं वर्षभरापूर्वी खोटं सांगून लग्न नक्की केल्याचा आरोप वधूच्या आईनं केला. लग्नाच्या तयारीत साडे पाच लाख रुपयांचा खर्च झाल्याचं तिनं सांगितलं. यानंतर आरोपीविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्याची रवानगी कोठडीत केली आहे.