शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंटार्टिकाहून आणणार हिमनग

By admin | Updated: May 7, 2017 00:57 IST

जगातील १० सर्वांत दुष्काळग्रस्त भागांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचा (युएई) समावेश होतो

नवी दिल्ली : जगातील १० सर्वांत दुष्काळग्रस्त भागांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचा (युएई) समावेश होतो. येथे दिवसेंदिवस पाणीटंचाई उग्र रूप धारण करीत आहे. संशोधकांच्या मते, येत्या २५ वर्षांत येथे एवढा दुष्काळ पडेल की, जीवन कठीण होऊन जाईल. या समस्येवर मात करण्यासाठी अबुधाबीच्या एका कंपनीने अद्वितीय योजना तयार केली आहे. ही कंपनी अंटार्टिका येथून मोठा हिमनग खेचून आणणार आहे. नंतर या हिमनगाला वितळवून त्यातून पिण्याचे पाणी काढले जाईल. ही गोष्ट ऐकताना सोपी वाटत असली तरी ती प्रत्यक्षात प्रचंड कठीण आहे. कारण, युएई आणि अंटार्टिकात दहा हजार कि.मी.चे अंतर आहे. कंपनीच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये हा प्रकल्प सुरू होईल. एका हिमनगाला युएईच्या किनाऱ्यावर आणण्यासाठी जवळपास एक वर्ष लागेल. त्यानंतर या हिमनगाचे तुकडे करून ते छोट्या-छोट्या बॉक्समध्ये भरण्यात येतील. सूर्यप्रकाशाने हे तुकडे वितळल्यानंतर त्याचे पाणी टाकीत गोळा केले जाईल. नंतर शुद्धीकरण करून ते पिण्यासाठी वापरले जाईल. एका हिमनगातून सरासरी २० अब्ज गॅलन पाणी मिळू शकते. युएईची लोकसंख्या जास्त नाही. त्यामुळे एवढे पाणी युएईच्या रहिवाशांसाठी पुरेसे आहे. हिमनगाला समुद्रकिनाऱ्यावर ठेवल्यामुळे तेथील वातावरणात आर्द्रता निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.