शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दुस-याच मृतदेहावर अंत्यसंस्कार, खरा मुलगा जिवंत

By admin | Updated: April 13, 2016 14:22 IST

पुत्तिंगल देवी मंदिरातील अग्नि दुर्घटनेत होरपळून मरण पावलेल्या नागरीकांच्या मृतदेहांची ओळख पटवणे खरोखरच खूप कठीण बनले आहे.

ऑनलाइन लोकमत 

कोल्लम, दि. १३ - पुत्तिंगल देवी मंदिरातील अग्नि दुर्घटनेत होरपळून मरण पावलेल्या नागरीकांच्या मृतदेहांची ओळख पटवणे खरोखरच खूप कठीण बनले आहे. आप्तजनांची ओळख पटवता येत नसल्याने मृतदेह अदलाबदलीच्या काही घटना समोर आल्या आहेत. तिरुअनंतपूरमजवळील मुद्दक्कल येथे रहाणा-या भवानी या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला अशाच अनुभवातून जावे लागले. 
 
भवानी यांचा २९ वर्षीय नातू प्रमोद आणि मुलगा राजन दोघे मंदिरातील आतशबाजी पाहण्यासाठी गेले होते. रविवारी दुपारी भवानी यांना त्यांच्या नातवाचा प्रमोदचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. भवानी यांचा दुसरा मुलगा प्रकाश रविवारी दुपारी त्रिवेंद्रम मेडीकल कॉलेजच्या रुग्णालयात गेले व तिथून एका जळलेला मृतदेह घरी आणला. 
 
मृतदेह अत्यंत वाईट स्थितीत असल्याने कुटुंबियांनी लवकर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. नातवाचा मृत्यू आणि मुलगा बेपत्ता असल्याने भवानी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्याचवेळी गावातील काही मुलांनी पुत्तिंगल देवी मंदिर दुर्घटनेतील जखमींची यादी वेबसाईटवर पाहिली. त्यामध्ये प्रमोदचे नाव होते. 
 
त्यांनी लगेच प्रमोदच्या कुटुंबाला ही माहिती दिली. प्रमोदची आई कोल्लमच्या रुग्णालयात पोहोचली. त्यावेळी प्रमोद तिथे जिंवत होता. त्याला किरकोळ जखमा झाल्या होत्या. भवानीच्या कुटुंबाने दुस-याच कुणावर प्रमोद समजून अंत्यसंस्कार केले होते. अंत्यसंस्कारासाठी घरी आणलेला मृतदेह पूर्णपणे जळालेला होता. ओठांच्या वर काही टाके होते. दातांमध्ये अंतर होते या खूणांवरुन तो  मृतदेह प्रमोदचा असल्याचा माझा समज झाला असे प्रकाश यांनी सांगितले. 
 
सोमवारी प्रकाश यांना तिरुअनंतपूरमवरुन एक फोन आला होता. ते आपल्या मुलाला शोधत होते. मुलाची ओळख सांगतांना त्यांनी ओठांच्यावर टाके असल्याचे सांगितले. कदाचित तो त्यांचा मुलगा असावा असे प्रकाश यांनी सांगितले. प्रमोद एक-दोन दिवसात घरी येईल पण भवानीला आता मोठा मुलगा राजनची चिंता लागून राहिली आहे. कारण राजनची अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. 
 
उत्सवात काम करण्याचे पाचशे रुपये मिळतील म्हणून प्रमोद आणि राजन तिथे गेले होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास फटाक्यांच्या आतशबाजी दरम्यान भीषण आग लागून १०० पेक्षा जास्त नागरीकांचा मृत्यू झाला होता.