शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

पंढरपुरात व्हॉट्स अ‍ॅपच्या चार अ‍ॅडमिन्सला अटक

By admin | Updated: August 12, 2015 08:50 IST

गेल्या १५ दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून गावागावांमध्ये चोर, दरोडेखोर घुसल्याचा संदेश पाठवून भीती पसरविणाऱ्या व्हॉट्स अ‍ॅपच्या चार गु्रप अ‍ॅडमिनसह नऊ जणांना पंढरपूर

पंढरपूर : गेल्या १५ दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून गावागावांमध्ये चोर, दरोडेखोर घुसल्याचा संदेश पाठवून भीती पसरविणाऱ्या व्हॉट्स अ‍ॅपच्या चार गु्रप अ‍ॅडमिनसह नऊ जणांना पंढरपूर तालुका पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली़ सोलापूर जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून रात्री चोर, दरोडेखोर येत असल्याची चर्चा गावागावांत होत आहे़ त्या भीतीने ग्रामीण भागातील लोक अख्खी रात्र जागून काढत आहेत़ व्हॉट्स अ‍ॅपद्वारे फॉरवर्ड होणाऱ्या संदेशांमुळे या अफवा वेगाने पसरल्या़पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ या तालुक्यांत चोरट्यांच्या अफवा पसरवत काल्पनिक फोटोही अपलोड करून व्हायरल करण्याचे काम जोरात सुरू होते. पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना आदेश देऊन अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. पंढरपूर परिसरातून मोठ्या प्रमाणात अफवा पसरविण्यात येत असल्याचे समोर येताच सोमवारी रात्री अफवेखोर अ‍ॅडमिनच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)असे आहेत ग्रुपविठ्ठल मंदिर परिसर, फ्रेंडशिप फॉरेव्हर, छत्रपती, मैत्री या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमिन व ग्रुपमधील पाच सदस्यांवर कारवाई झाली.

५0 मोबाइल तपासलेपंढरपूर तालुका पोलिसांनी एका तरुणाच्या मोबाइलची तपासणी केली असता, त्याच्याच मोबाइलवर तीन ग्रुप सापडले. त्याच आधारे तपास केला असता आणखी एक ग्रुप आढळला. दिवसभर ५0 मोबाइलची तपासणी करण्यात आली.