शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनीच सरकारविरुद्ध उग्र आंदोलन

By admin | Updated: August 15, 2014 00:17 IST

नवाज शरीफ यांनी गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.

इस्लामाबाद : पंतप्रधान नवाज शरीफ यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी हजारो निदर्शक गुरुवारी लाहोरहून राजधानी इस्लामाबादकडे निघाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत राजकीय अस्थिरता आणि लष्कराच्या हस्तक्षेपाची भीती व्यक्त होत आहे. नवाज शरीफ यांनी गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.१४ आॅगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना सरकारविरोधातील दोन गटांना न्यायालयाने शेवटच्या क्षणी निदर्शनांची परवानगी दिली. त्यामुळे उत्साहात या निदर्शकांनी ३७० किलोमीटर लांब प्रवासाचा राजधानीकडे मार्च सुरू केला. राजधानी इस्लामाबादला सध्या लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. महत्त्वाच्या सरकारी ठिकाणांवर लष्कराचा कडक पहारा आहे. निदर्शकांचे नेतृत्व माजी क्रिकेटपटू इमरान खान आणि कॅनडात वास्तव्यास असलेले मौलवी ताहीर उल कादरी हे करीत आहेत. नवाज शरीफ यांनी लवकरात लवकर निवडणुका जाहीर कराव्यात यासाठी हे दोन गट दबाव आणण्याच्या प्रयत्नात आहेत. अवघ्या वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत नवाज शरीफ बहुमताने विजयी झाले होते. ‘या मार्चमध्ये तुम्ही माझ्यासाठी नव्हे तर तुमच्या मुलांसाठी आणि तुम्हाला जर पाकिस्तानात खरोखरचे स्वातंत्र्य हवे असेल तर सहभागी व्हा,’ असे आवाहन खान यांनी मार्च सुरू होण्यापूर्वी केले. कादरी यांनी इन्कलाब मार्च सुरू होण्यापूर्वी केलेल्या भाषणात पाकिस्तानात लोकशाही स्थापन करण्याचे व पाकिस्तानातून दारिद्रय नष्ट करण्याचे मार्चचे ध्येय असल्याचे जाहीर केले. (वृत्तसंस्था)