महिलांना त्या त्यांच्या वयापेक्षा अधिक तरुण आहेत, असे म्हटल्यास जास्त आनंद होतो; परंतु इंग्लंडमध्ये सारा क्लीअर (३९) यांना एका स्टोअरमध्ये तंबाखू विकण्यासाठी विक्रेतीने ओळखपत्र मागितल्यामुळे राग आला. त्यांना तंबाखू विकत घ्यायची होती व त्यासाठी आपल्या वयाचा दाखला द्यावा लागेल, असे त्यांना अपेक्षितच नव्हते. त्यामुळे त्यांनी ओळखपत्र जवळ ठेवले नव्हते.वयाची बंधने असलेल्या उत्पादनांसाठी २५ वयाच्या आतील व्यक्तीकडे ओळखपत्र मागितले जाते. सारा यांना वेस्ट ससेक्समधील सॅन्सबरीच्या शिसेस्टर शाखेत ओळखपत्र नसल्यामुळे तंबाखू द्यायला नकार दिल्यामुळे त्यांना खूप अपमानित झाल्यासारखे वाटले. इतर लोक माझ्याकडे बघत होते. विक्रेत्या महिलेने मी तिला तंबाखू मागितल्यावर माझे ओळखपत्र मागितले. मी तिला म्हटले की मी ३९ वर्षांची आहे. मला २१ वर्षांचा मुलगा आहे.यापूर्वी सारा यांना याच दुकानात कधीही अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागलेले नाही. सारा म्हणाल्या की, ‘‘माझे जे खरेखुरे वय आहे तशी मी न दिसता २५ वर्षांची दिसते. मला कामाला जायचे असल्यामुळे मी तेथील व्यवस्थापकाशी बोलू शकले नाही की तक्रारही करू शकले नाही. खरे तर मला मिळालेली ती पावतीच होती. मला नेहमी लोकांचे मेसेजेस येतात व अनेक जण विचारतात की तुम्ही स्कीनची कशी काळजी घेता. तुम्ही तुमच्या वयापेक्षा खूप तरुण दिसता. मी एवढ्या (३९) वयाची आहे यावर लोकांचा सहसा विश्वासच बसत नाही. मी वीस वर्षांची असावी असा त्यांचा समज होतो. माझा मुलगा माझा भाऊ असावा, असे लोक समजतात.’’ज्या दुकानात सारा क्लीअर यांना तंबाखू नाकारण्यात आली त्याच्या प्रवक्त्याने त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. तो म्हणाला की, ‘‘तुमची जी गैरसोय झाली त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. तथापि, वयाची अट असलेली उत्पादने अल्पवयीनांना विकायची नाहीत, या आदेशांचे आम्हाला पालन करावेच लागते. आमच्या सहका-यांना जो कोणता ग्राहक २५ वयाच्या खालचा आहे त्याला ओळखपत्र मागावेच लागते.’’
इंग्लंडमध्ये ३९ वर्षांच्या महिलेला २५ वर्षांची समजल्याने आला राग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 03:02 IST