शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

लिपस्टिक वापरण्याचे दुष्परिणाम

By admin | Updated: February 21, 2017 13:32 IST

महिलांच्या सौंर्दयात लिपस्टिक भर घालते यात काही शंका नाही, मात्र याचे दुष्परिणाम माहिती आहेत का? आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, असे वाटत असेल तर दुष्परिणाम नक्की जाणून घ्या.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 21 - महिलांच्या मेक-अप किटमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लिपस्टिक. लिपस्टिकशिवाय कोणतेही मेक-अप किट पूर्ण होऊ शकत नाही. निरनिराळे रंग आणि ब्रँड्सच्या लिपस्टिकमुळे मेक-अप किट पूर्ण झाल्यासारखं महिलांना वाटतच नाही.  
 
महिलांच्या सौंदर्यात लिपस्टिक भर घालते यात काही शंका नाही, मात्र याचे दुष्परिणाम माहिती आहेत का? आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, असे वाटत असेल तर दुष्परिणाम नक्की जाणून घ्या.  
 
लिपस्टिकचे दुष्परिणाम पाहिल्यानंतर प्रत्येक 'ती'ला हवीहवीशी वाटणारी लिपस्टिक नकोशी होईल. घरातून बाहेर पडताना ब-याच प्रमाणात महिलावर्ग लिपस्टिकचा वापर करतात, ती लिपस्टिक पूर्ण दिवस किंवा कधी-कधी रात्री झोपतानाही तशी ओठांवर कायम असते. 
 
काही लिपस्टिकमध्ये शिसांचे प्रमाण असते, जे शरीरासाठी अत्यंत हानिकारक आणि नुकसान पोहोचवणारे असते. यामुळे एलर्जी, चुरचुरणे आणि ओठ आणि त्या शेजारी त्वचेवर चिरा पडणे, यांसारखी लक्षणे समोर  येतात. यातील घातक रसायने आणि जड धातूंमुळे कॅन्सरदेखील होण्याची शक्यता आहे. 
 
एक नजर टाकूया लिपस्टिकच्या दुष्परिणामांवर 
 
1. जड धातूंमुळे मूत्रपिंडाला धोका 
लिपस्टिकमध्ये कॅडमियम, मॅग्नेशियम आणि क्रोमियम यांसारखे घातक धातू असतात. या धातूंमुळे आरोग्याशी संबंधित धोकादायक रोग आणि शरीराच्या अवयवांना नुकसान पोहोचण्याची शक्यता असते. कॅडमियमच्या अति प्रमाणामुळे मूत्रपिंडासंबंधित आजार होण्याचा धोका असतो. तसंच लिपस्टिकच्या वारंवार वापरामुळे पोटाचा ट्युमरदेखील होऊ शकतो, असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 
 
2. शिसांमुळे मज्जासंस्थेवर परिणाम
शिसे हे लिपस्टिकमध्ये वापरण्यात येणारे सर्वसामान्य घटक.  यामध्ये न्यूरोटॉक्सिन हा विषारी घटक असून तो मज्जासंस्थेवर वाईट परिणाम करतो. शिवाय, मेंदू, हार्मोन आणि प्रजनन प्रक्रियेवरही याचा परिणाम होऊ शकतो.  
 
3.घातक पेट्रोकेमिकल 
लिपस्टिकमधील पेट्रोकेमिकलमुळे शारीरिक-बौद्धिक विकासासहीत प्रजननावर दुष्परिणाम होतो.
 
4. कॅन्सर होण्याची शक्यता
लिपस्टिक जास्त काळापर्यंत टिकून राहावी यासाठी त्यात वापरली जाणा-या जंतुनाशकांमध्ये कॅन्सर या रोगाला आमंत्रण देणारे घटक असतात. शिवाय, यात असलेल्या खनिज तेलामुळे स्किन पोर्स ब्लॉक होतात यामुळे शरीरावर कायमस्वरुपी हानिकारक परिणाम होण्याची शक्यता आहे. 
 
5. रसायनं शरीरासाठी घातक  
बिस्मथ ऑक्झिक्लोराईड (bismuth oxychloride) हे रसायन लिपस्टिक टिकून राहावी यासाठी वापरले जाते, जे शरीरासाठी अंत्यत घातक आहे. 
 
6. पोटात जातंय विष
अनेकदा ओठांवरुन जीभ फिरवताना  किंवा जेवताना ब-याच लिपस्टिकही खाल्ली जाते. त्यामुळे कित्येक त्यातील विषारी पदार्थ पोटात जातात.  अॅल्युमिनियम, कॅडमियम, क्रोमियम व मॅगनीज सारखी विषारी रसायनं पोटात गेल्यानं मोठ्या प्रमाणात आरोग्याला धोका होऊ शकतो. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
 
त्यामुळे यापुढे लिपस्टिक खरेदी करताना त्यात घातक, हानिकारक रसायनं नाहीत, याबाबत पडताळणी करुन घ्यायला विसरू नका.