शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

डॉक्टरांनी दिले तिघांना जीवनदान

By admin | Updated: January 25, 2016 01:40 IST

नवी मुंबईतील एका पशुवैद्यकीय तज्ज्ञाने अवयवदान केल्यामुळे तिघांना जीवनदान मिळाले आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या या ३७ वर्षीय डॉक्टरांना २३ जानेवारीला

मुंबई : नवी मुंबईतील एका पशुवैद्यकीय तज्ज्ञाने अवयवदान केल्यामुळे तिघांना जीवनदान मिळाले आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या या ३७ वर्षीय डॉक्टरांना २३ जानेवारीला बाईकवरून जाताना ब्रेनस्ट्रोकचा अ‍ॅटॅक आला. त्यामुळे ते बाईकवरून पडले. त्यानंतर तत्काळ त्यांना वाशीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आल्यानंतर कुटुंबीयांच्या संमतीने मूत्रपिंडे आणि यकृताचे दान करण्यात आले. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्या वेळी त्यांना ब्रेनडेड घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एमजीएम रुग्णालयाचे प्रशासक पी. के. शशांकर यांनी दिली. सायंकाळी सातच्या सुमारास कुटुंबीयांना बोलवण्यात आले. त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांना रुग्णाची परिस्थिती समजवण्यात आली. त्यानंतर त्यांना अवयवदानाची माहिती देण्यात आली. रुग्णाच्या पत्नीने मूत्रपिंड आणि यकृत दानाला संमती दर्शवली. त्यानंतर रात्री साडेबारा वाजता सर्व परवानग्या आल्यावर अवयव काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. एक मूत्रपिंड एमजीएम रुग्णालयातील ५९ वर्षीय रुग्णास देण्यात आले, तर दुसरे मूत्रपिंड फोर्टिस रुग्णालयातील ४६ वर्षीय रुग्णास देण्यात आले. यकृत ज्युपिटर रुग्णालयातील ६४ वर्षीय रुग्णास देण्यात आले. २४ जानेवारीला सकाळी साडेसात वाजता सर्व शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या. (प्रतिनिधी)