शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

लहान आकाराच्या कंडोममुळे आफ्रिकेत एड्सप्रतिबंध करण्यास अडचण

By admin | Updated: September 19, 2014 19:51 IST

एचआयव्ही एड्स ही आफ्रिकेतील महत्वाची डोकेदुखी आहे. एचआयव्ही एड्सवर प्रतिबंध म्हणून जे काही उपाय आहेत त्यामध्ये शरीर संबंध ठेवताना कंडोम वापरणे हा एक आहे

ऑनलाइन लोकमत
कंपाला (पूर्व आफ्रिका), दि. १९ - एचआयव्ही एड्स ही आफ्रिकेतील महत्वाची डोकेदुखी आहे. एचआयव्ही एड्सवर प्रतिबंध म्हणून जे काही उपाय आहेत त्यामध्ये शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरणे हा एक आहे. आफ्रिकेतील पुरुषांना कंडोम त्यांच्या आकाराचे मिळत नसल्याने एचआयव्ही एड्सला प्रतिबंध करण्यास समस्या उद्भवत असल्याचे येथील खासदारांनी सांगितले आहे. खासदार टॉम अझा यांनी असे सांगितले की, काही दिवसांपूर्वीच युगांडाच्या संसदेतील एचआयव्ही एड्स प्रतिबंधक समितीने केलेल्या सर्वेक्षणात असे निदर्शनास आले आहे की, एकाच आकाराचे कंडोम सर्वलोकांना वापरता येणे अशक्य आहे. तसेच  प्रत्येक व्यक्तीची शरीररचना वेगळी असल्याने त्यांच्या शरीररचनेनुसार कंडोमचा आकारही बदलते. कंडोमचा अयोग्य आकार हे एचआयव्ही एड्स पसरवण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचेही निदर्शनास आले आहे. 
त्याचप्रमाणे येथील युवकांशी संवाद साधला असता त्यांनी असे सांगितले की, शरीरसंबंधांदरम्यान कंडोम फाटल्यानेही अडचणी येतात. युवकांनी एड्स प्रतिबंध समितीला असे सांगितले की, वेगवेगळ्या आकाराचे कंडोम मिळाल्यास एचआयव्ही एड्सची समस्या सुटण्यास हातभार लागेल. कंडोमच्या मापावरून समस्या उद्भवण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी मुंबईत २००६ साली इंडियन काऊंसील ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या एका पाहणीत ६० टक्के लोकांना आंतरराष्ट्रीय कंडोमच्या आकारापेक्षा कमी आकाराचे कंडोम लागत असल्याचे निदर्शनास आले होते. तर, ३० टक्के लोकांना कंडोमच्या आकारामुळे समस्या येत होती. फक्त युगांडामध्ये एड्समुळे दगावणा-या लोकांची संख्या ८० हजार इतकी होती. युगांडा सरकारने राबवलेल्या प्रतिबंधात्मक उपचारांमध्ये जोडीदाराशी एकनिष्ठ असणे, व कंडोम वापरण्यावरभर दिला होता. या प्रतिबंधात्मक उपचारांमुळे एड्सने दगावणा-यांची संख्या आटोक्यात आली. एड्समुळे पालक दगावल्याने अनेक मुलं अनाथ होत होती. प्रतिबंधात्मक योजनेमुळे ही समस्याही आटोक्यात आली आहे.