नवी दिल्ली : सामान्यपणे खनन कार्यात वापरण्यात येणारी आणि सहजगत्या उपलब्ध असलेली ‘डिटोनेटिंग वायर’ देशाच्या लाल कॉरिडोरमध्ये नक्षलवाद्यांकडून घडविण्यात येणाऱ्या अनेक आयईडी स्फोटांचा मुख्य आधार बनलेली आहे.या ‘कॉर्डटेक्स वायर’ची विक्री आणि वापरावर निर्बंध घालण्याचा अथवा त्याचे नियमन करण्याचा पर्याय आता नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी असलेल्या सुरक्षा संस्था शोधत आहेत. सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य बनविणे, त्यांची हत्या करणे आणि एवढेच नव्हे तर सामान्य नागरिकांनाही लक्ष्य बनविण्यासाठी नक्षल कॅडर या ‘इम्प्रुवाईज एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस’चा (आयईडी) स्फोट घडवून आणत असतात.यासंदर्भात एका विश्लेषणात्मक अहवालाचा हवाला देताना ‘लेफ्ट विंग एक्ट्रेमिजम’ (एलडब्ल्यूई) थिएटरमध्ये पदस्थापित असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘नक्षलवादी आयईडीचा वापर करून गावठी २५० ते ३०० गावठी बॉम्ब बनविणे आणि त्यांचा स्फोट घडविण्यासाठी या कॉर्डटेक्स वायरचा उपयोग करतात. त्याला ‘देसीचेन’ असे संबोधले जाते आणि ते उत्प्रेरकाचे काम करते. माओवाद्यांनी अनेक आयईडी बॉम्बस्फोटांमध्ये याचा वापर केलेला आहे. ही कॉर्डटेक्स तार स्फोटकांना आपसात जोडण्याच्या कामी येते आणि ती प्लास्टिकने झाकलेली असते, त्यामुळे ती स्फोटकांमध्ये उत्प्रेरकाचे काम करते.’(वृत्तसंस्था)
जीवघेणी ठरतेय ‘डिटोनेटिंग वायर’
By admin | Updated: October 13, 2014 02:45 IST