शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

लंडनमध्ये डौलाने फडकला तिरंगा

By admin | Updated: August 16, 2016 16:49 IST

दरवर्षी भारतीय वकिलातीच्या भिंतीआड होणारा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा यावर्षी लंडनमध्येदेखील उत्साहात साजरा करण्यात आला

सतीश डोंगरे/ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 16 - दरवर्षी भारतीय वकिलातीच्या भिंतीआड होणारा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा यावर्षी लंडनमध्येदेखील उत्साहात साजरा करण्यात आला. लंडनस्थित शेकडो भारतीय नागरिकांनी बार्किंग टाऊन हॉल येथे एकत्र येऊन डौलाने तिरंगा फडकाविला. यावेळी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांनी या सोहळ्याचा आनंद आणखीच द्विगुणित केला. लंडनमध्ये वास्तव्य करणाऱ्या भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आपला राष्ट्रीय उत्सव साजरा करून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर महापुरुषांना अभिवादन करता यावे या हेतूने भारतीय नागरिकांनी हा उत्सव साजरा करण्याचे ठरविले. त्यानुसार बार्किंग टाऊन हॉल येथे सकाळी सात वाजताच शेकडोच्या संख्येने लहान-मोठ्यांसह नागरिक कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले होते. सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हणण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर खास भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. रंगीबेरंगी कपडे परिधान करून आलेल्या चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच विविध राज्यांची संस्कृती दर्शविणारी नृत्येही सादर करण्यात आली. चिमुकल्यांचा उत्साह बघून काही ब्रिटन नागरिकही या अभूतपूर्व सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांनीदेखील तिरंग्याला मानवंदना देऊन भारतीय नागरिकांसोबत या उत्सवाचा खऱ्या अर्थाने आनंद लुटला. बार्किंग टाऊन हॉल येथे स्वातंत्र दिन साजरा करण्याचे हे पहिलेच वर्ष असून, ही परंपरा भविष्यात कायम ठेवण्याचे मत यावेळी आयोजकांतर्फे व्यक्त करण्यात आल्याची माहिती नाशिकमधून लंडनमध्ये स्थित झालेल्या अपर्णा महाले यांनी दिली.