शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३३ लोकसंख्या असलेला देश

By admin | Updated: July 7, 2017 01:31 IST

आमच्या देशात राजकीय पुढाऱ्यांचे संरक्षण म्हणजे सामान्य जनतेला संकटच वाटते. हे नेते कुठेही गेले तरी त्यांच्या आगेमागे वाहने, सुरक्षा यंत्रणा

आमच्या देशात राजकीय पुढाऱ्यांचे संरक्षण म्हणजे सामान्य जनतेला संकटच वाटते. हे नेते कुठेही गेले तरी त्यांच्या आगेमागे वाहने, सुरक्षा यंत्रणा फिरत असते. परंतु जगात असा एक देश आहे की त्याचे राष्ट्रपती कोणत्याही संरक्षणाशिवाय रस्त्यांवर फिरतात. या देशाची लोकसंख्या चार कुत्र्यांसह आहे फक्त तेहतीस. अमेरिकेच्या नेवाडात असलेल्या या देशाचे त्याचे स्वतंत्र कायदे, परंपरा व स्वत:चे चलन आहे. देशाचे नाव आहे मोलोशिया. १९७७ मध्ये केविन बॉघ आणि त्याच्या मित्राच्या डोक्यात आपला स्वत:चा देश स्थापन करण्याचा विचार आला व त्या दोघांनी मोलोसियाची स्थापना केली तेव्हापासून केविन त्याचे राष्ट्रपती आहेत. त्यांनी स्वत:ला हुकूमशहा जाहीर करून टाकलेले आहे. त्यांच्या पत्नीला देशाची पहिली महिला (फर्स्ट लेडी) असा दर्जा आहे. मोलोशियात राहणारे बहुतेक लोक हे केविन यांचे नातेवाईक आहेत. जगातील कोणत्याही देशाने अजून मोलोशियाला मान्यता दिलेली नाही. ज्या मित्रासोबत केविन यांनी देश स्थापन करण्याचा विचार केला होता त्या मित्राने लवकरच अंग काढून घेतले. परंतु केविनने आपला विचार सुरूच ठेवला. अनेक पर्यटक या देशात येतात. दोन तासांच्या या पर्यटनात स्वत: केविन त्यांना देशाच्या इमारती दाखवतात.