शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

'ऐ दिल है मुश्किल'मधील बोल्ड दृश्यांना सेन्सॉरची कात्री

By admin | Updated: October 13, 2016 17:05 IST

ऐ दिल है मुश्कील या चित्रपटातील ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांच्यावर चित्रीत झालेल्या बोल्ड दृश्यांना कात्री लावल्याची माहिती आता समोर येते आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 13 - करण जोहर दिग्दर्शित ऐ दिल है मुश्कील या चित्रपटातील ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांच्यावर चित्रीत झालेल्या बोल्ड दृश्यांना कात्री लावल्याची माहिती आता समोर येते आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा सहभाग असल्यामुळे ऐ दिल है मुश्किल या चित्रपटावर आधीपासूनच टांगती तलवार आहे. मनसेनं हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ न देण्याचा निर्धार केला असतानाच आणखी एक प्रसंग या चित्रपटाच्या प्रदर्शनावर ओढावला आहे.

ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांची केमिस्ट्री असणाऱ्या या चित्रपटातील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री लागल्याची चर्चा आहे. बहुचर्चित चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यापूर्वी ऐश्वर्या आणि रणबीरवर चित्रीत करण्यात आलेल्या बोल्ड दृश्यांना सेन्सॉरने चित्रपटातून काढून टाकले. विशेष म्हणजे ऐश्वर्याचे सासरे अमिताभ बच्चन यांनी या दृश्यांवर आक्षेप घेऊन करण जोहरला ते चित्रपटातून काढून टाकण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीवरूनच ही आक्षेपार्ह दृश्यं काढल्याची चर्चा आहे.

सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने या चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र दिले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून रणबीर आणि ऐश्वर्याचा बोल्ड सीनही गायब करण्यात आला आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाची सध्या रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, या चित्रपटामधून पाकिस्तानी अभिनेता फवाद खान ऐवजी त्याच्या भूमिकेसाठी सैफ अली खानचे नाव चर्चेत आहे. पाकिस्तानी कलाकारांना होणारा विरोध पाहता हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे या चित्रपटात फवाद दिसणार की नाही हे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच समजणार आहे. येत्या २८ ऑक्टोबरला हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.