शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

सावधान ! ओरल सेक्समुळे तुम्हाला होऊ शकतो हा रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 16:37 IST

ओरल सेक्स केल्यानं भयंकर असा गोनोरिया नावाचा जंतूसंसर्ग(असुरक्षित सेक्समुळे होणारे संसर्ग) उद्भवतो. अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - ओरल सेक्स केल्यानं भयंकर असा गोनोरिया नावाचा जंतूसंसर्ग(असुरक्षित सेक्समुळे होणारे संसर्ग) उद्भवतो.  महत्त्वाचे म्हणजे कंडोम न वापरल्यानं हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची भीती आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) दिली आहे. 
 
""बीबीसी""नं दिलेल्या माहितीनुसार, जर एखादा व्यकी गोनोरिया संसर्गास बळी पडला तर यावर उपचार करणं कठीण आहे. कारण अनेक प्रकरणांमध्ये या संसर्गावर उपाय नसल्याची माहिती आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) दिला आहे. 
 
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, प्रत्येक वर्षी 7.8 कोटी लोकं गंभीर स्वरुपातील लैंगिक संसर्गाला बळी पडतात आणि याचा थेट परिणाम प्रजनन क्षमतेवर होत असल्याचं निदर्शनास आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 77 देशांतील आकडेवारीचं विश्लेषण केले. यावरुन त्यांना अशी माहिती मिळाली की, गोनोरियाविरोधात प्रतिकार करणं औषधांसाठी सोपे नाही. 
 
आणखी बातम्या वाचा
 
(योगी सरकार नवविवाहितांना "शगुन"मध्ये देणार कंडोम व गर्भनिरोधक गोळ्या)
(भारतात आता मिळणार मोफत कंडोम)
 
त्यांनी असेही सांगितले की, गोनोरिया एक असा जंतू आहे, ज्यावर औषधांचा काहीही परिणाम होत नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉक्टर टिओडोर व्हाय यांनी सांगितले की, यातील जपान, फ्रान्स आणि स्पेन असे देश आहेत की जेथे या रोगावर कोणत्याही प्रकारचा उपाय नाही. 
 
ओरल सेक्स 
गोनोरियामुळे गुप्तांग, गुदद्वार आणि घशाला संसर्ग होऊ शकतो. मात्र पुढे याबाबत चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. जर घशातील सामान्य खवखव ठीक करण्यासाठी तुम्ही औषधं घेतली तर ती नायशेरिया प्रजातींसोबत मिसळतात व प्रतिकार करतात. मात्र, ओरल सेक्सद्वारे गोनोरिया जंतूंचा हल्ला होतो आणि यामुळे भयंकर गोनोरिया पसरण्याची भीती असते. 
 
काय आहे गोनोरिया ?
गोनोरिया हा संसर्ग रोग असुरक्षित योनी, गुदद्वार आणि ओरल सेक्समुळे पसरतो.   10 पैकी एक हेट्रोसेक्शुअल पुरुष, 75 टक्के महिला आणि गे पुरुषांना या संसर्गाची लागण होते. मात्र या रोगाची लक्षणं सहजरित्या ओळखता येत नाही.  
मात्र, या संसर्गाची लागण झाल्यास लघवी करताना व मासिक पाळीदरम्यान वेदना होणे या लक्षणांद्वारे ओळख पटवता येऊ शकते.  या संसर्गावर उपाय होणं शक्य नसल्याने याचा प्रजनन क्षमतेवर थेट परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.