शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत धुळीत बसून दिली परीक्षा

By admin | Updated: March 17, 2016 01:41 IST

मंगळवारी सुरू झालेल्या एमएच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ढेपाळलेल्या नियोजनाचा फटका विद्यार्थ्यांना बसला. बाकांची संख्या कमी असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना धुळीत बसून

औरंगाबाद : मंगळवारी सुरू झालेल्या एमएच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ढेपाळलेल्या नियोजनाचा फटका विद्यार्थ्यांना बसला. बाकांची संख्या कमी असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना धुळीत बसून पेपर द्यावा लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात हा प्रकार घडला, तर दुसरीकडे मौलाना आझाद महाविद्यालयात एमए उर्दू आणि एमसीजे या दोन विषयांचे पेपर तब्बल एक तास उशिराने सुरू झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एमएच्या परीक्षेचा इंग्रजी विषयाचा (३० गुण) पेपर सकाळी १० वाजता होणार होता. मात्र, परीक्षा क्रमांक दिसून न आल्याने विद्यार्थी चलबिचल झाले. नंतर महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी तीन हॉलमध्ये व्यवस्था होती. ग्रंथालयातील एका रीडिंग टेबलवर चार ते सहा विद्यार्थी एकत्रित बसून पेपर लिहिताना दिसले. वरच्या मजल्यावरील दोन खोल्यांमध्ये तीस ते चाळीस विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली. मात्र, या खोल्या अनेक महिन्यांपासून झाडलेल्या नसल्याने धुळीने माखलेल्या होत्या. पाच ते सहा विद्यार्थिनींना बसायला बेंच नव्हते. त्यामुळे त्यांना एका लाकडी बाकड्यावर बसविण्यात आले. काही विद्यार्थ्यांना चक्क जमिनीवर धुळीत बसून पेपर लिहावा लागला. अनेक विद्यार्थ्यांनी पेपर लिहिण्यासाठी पॅड आणले नव्हते, त्यामुळे त्यांची पंचाईत झाली.या संदर्भात आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर साळवे यांच्याशी संपर्क साधताच ते म्हणाले, ‘प्राचार्यांचा परीक्षेशी काही संबंध नसतो.’ केंद्रप्रमुख डॉ. व्ही. के. खिल्लारेंनी सांगितले, ‘विद्यापीठाने ऐन वेळी विद्यार्थ्यांनी संख्या वाढवल्याने हा प्रकार घडला व विद्यार्थ्यांना धुळीत बसावे लागले.’ विद्यापीठाने परीक्षा केंद्राचे नियोजन आधीपासून असल्याचे म्हटले व महाविद्यालयाचीच चूक असल्याचे म्हटले आहे.