पावसाळ््यात घराचे छत गळणे यात नवे काही नाही. परंतु विमानाच्या छतातून पाणी गळत असेल तर? एवढे महागाचे तिकीट घेतल्यानंतर प्रवासी गळणाऱ्या छताच्या विमानात बसेल? परंतु हे अमेरिकेची कंपनी डेल्टाच्या विमानात घडले आहे. हे विमान अटलांटाहून फ्लोरिडाला निघाले होते. अनेक प्रवाशांना गळणाऱ्या छताखाली बसून प्रवास करावा लागला. त्याचे काही व्हिडीओज टिष्ट्वटरवरही पोहोचले. त्यात मॅककॉलो नावाच्या प्रवाशाला इच्छा नसतानाही शॉवरखाली आंघोळ घडली. व्हिडीओमध्ये मॅककॉलो काही मासिकांना डोक्यावर पडणारे पाणी दुसरीकडे वळविताना दिसतो.
विमानाचे गळणारे छत
By admin | Updated: July 3, 2017 00:42 IST