शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

या माशांना पाहिल्यानंतर मासे खाणेच विसराल..

By admin | Updated: May 4, 2017 01:07 IST

मासे दिसायला आकर्षक असतात, तसेच त्यांची चवही स्वादिष्ट असते. त्यामुळेच मांसाहारी लोक आवडीने मासे खातात. माशांचे

सिडनी : मासे दिसायला आकर्षक असतात, तसेच त्यांची चवही स्वादिष्ट असते. त्यामुळेच मांसाहारी लोक आवडीने मासे खातात. माशांचे सेवन केल्यामुळे शरीराला सर्व प्रकारचे पोषण मिळते. त्यामुळे डॉक्टरही मासे खाण्याचा सल्ला देतात; मात्र काही मासे असे आहेत ज्यांना पाहिल्यानंतर तुम्ही मासे खाणे तर सोडा त्यांना पाहणेही सोडाल. फंगटुश फिशया माशाचे नाव फंगटुश फिश असून, महासागरातील सर्वात लांब दाताचा मासा म्हणूनही तो ओळखला जातो. या माशाचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ रात्रीच शिकार करतो. ग्रिनेडियर फिशहे मासे समुद्रात अधिक प्रमाणात आढळून येतात. या माशाचे डोळे एवढे बटबटीत आहेत की, त्यांच्याकडे पाहावलेही जात नाही; मात्र भक्ष्य पकडण्यासाठी या डोळ्यांची खूप मदतहोते. स्कॅबर्ड फिशकाळ्या रंगाच्या या माशाचे रूप बटबटीत आहे. हा मासा चपळ असून, विद्युत वेगाने शिकार करतो. दुसऱ्या माशाचे भक्ष्य होऊ नये म्हणून रंग बदलण्याचे कसबही त्याच्याकडे आहे. अत्यंत टोकदार दात असलेला हा मासा अटलांटिक महासागरात आढळतो. सिटोर्हिनस मॅक्सिमसया माशाचे नाव ‘सिटोर्हिनस मॅक्सिमस’ आहे. व्हेल शार्कनंतरचा हा जगातील दुसरा सर्वात मोठा मासा आहे. हा मासा खोल पाण्यात राहतो. हा मासाही कुरूप आहे. मोंकफिशहा मासा उत्तरेकडील समुद्रात आढळून येतो. त्याचे नाव मोंकफिश असून, शिकार पकडण्यासाठी तो आपला जबडा गरजेप्रमाणे बदलतो. हा मासाही दिसायला विद्रूप आहे. सी स्पायडर हा मासा दक्षिण सागरी किनारा आणि अटलांटिक महासागरात आढळून येतो. ‘सी स्पायडर’ असे या माशाचे नाव असून, त्याचे डोळे मोठे आणि बटबटीत असतात. त्यांच्या डोळ्यात प्रकाश शोषण्याची विशेष क्षमता असते.