शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

आदित्य नारायणची एअरपोर्टवर अधिकाऱ्याला दमबाजी, याआधीही अडकला बऱ्याच वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 18:05 IST

बोर्डींगच्यावेळी अधिकारी आणि आदित्य यांच्यात बाचाबाची झाली. जास्त जास्त सामान घेऊन जाण्यासाठी आदित्य जबरदस्ती करत होता.

ठळक मुद्देत्याने अधिकाऱ्याला ‘कधी मुंबईत आलास तर बघून घेईन, तुझे कपडे नाही उतरवले तर माझं नाव आदित्य नारायण नाही’ अश्या धमक्या द्यायल्या सुरुवात केली.कोणत्याही सेलिब्रिटी किंवा स्टारकिड्सनी त्यांच्या स्टारडमचा गैरवापर करु नये, असं प्रत्यश्रदर्शींचं म्हणणं होतं. तसंच या घटनेत चुक आदित्यची होती, असंही ते म्हणाले.वादात अडकण्याचीही त्याची पहिली वेळ नाही, तर याआधीसुध्दा बऱ्याचदा अनेक कॉन्ट्रोव्हर्सीजमध्ये अडकला आहे.

ज्येष्ठ गायक-संगीतकार उदीत नारायण यांच्या मुलाने इंडीगो एअरलाईन्सच्या अधिकाऱ्याला दमदाटी केल्याची बातमी आहे. ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन जाण्याच्या वादातून ही बाचाबाची झाली.

बोर्डींगच्यावेळी हा अधिकारी आणि आदित्य यांच्यात बोलणं झालं. १७ किलोपेक्षा जास्त सामान घेऊन जाण्यासाठी आदित्य जबरदस्ती करत होता. मात्र अर्थातच अधिकारी त्याला परवानगी देत नव्हते. त्यामुळे आदित्य संतापला. त्याने सर्वांवर आवाज चढवायला सुरुवात केली. त्याने अधिकाऱ्याला ‘कधी मुंबईत आलास तर बघून घेईन, तुझे कपडे नाही उतरवले तर माझं नाव आदित्य नारायण नाही’ अश्या धमक्या द्यायल्या सुरुवात केली.

पाहा व्हिडीओ - 

आदित्य नारायण दसऱ्याच्या दिवशी रायपूरला गेला होता. रात्री तिकडे त्याचा शो झाला. इंडीगो एअरलाईन्सच्या नियमांविरुध्द १७पेक्षा जास्त किलो सामान नेण्याच्या हट्टावर तो अडला होता. शेवटी त्या अधिकाऱ्याची माफी मागितल्यावरच आदित्यला बोर्डींगची परवानगी मिळाली.

 आदित्यचा हा अवतार पाहून घटनेच्या प्रत्यक्षदर्शींचा संताप झाला. कोणत्याही सेलिब्रिटी किंवा स्टारकिड्सनी त्यांच्या स्टारडमचा गैरवापर करु नये, असं त्या सर्वांचं म्हणणं होतं. तसंच या घटनेत चुक आदित्यची होती, असंही प्रत्यश्रदर्शींचं म्हणणं आहे.

स्ट्रायकर या चित्रपटात लीड करणारा आदित्य नारायण पुन्हा कुठे फारसा दिसला नाही. सध्या छोट्या पडद्यावरील एका रिअलिटी शोमध्ये तो निवेदन करताना दिसतो.

वादात अडकण्याचीही त्याची पहिली वेळ नाही, तर हाच आदित्य याआधीसुध्दा बऱ्याचदा अनेक कॉन्ट्रोव्हर्सीजमध्ये अडकला आहे. एकदा एका रेस्टॉरंटमध्ये अंगलट करणाऱ्या आदित्यला एका मुलीने कानशिलात लगावल्याची बातमी आली होती. मात्र ती मुलगी कोण हे काही समजु शकले नाही. एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घडलेला हा प्रकार बराच गाजला होता.