शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री पंखुरी अवस्थीनं लगावली चाहत्याच्या श्रीमुखात

By admin | Updated: March 20, 2017 16:35 IST

रजिया सुल्तान या मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या पंखुरीनं एका व्यक्तीचा कानशिलात लगावली आहे

ऑनलाइन लोकमतधर्मशाळा, दि. 20 - रजिया सुल्तान या मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या पंखुरीनं एका व्यक्तीचा कानशिलात लगावली आहे. त्या व्यक्तीनं पंखुरीला चुकीच्या भावनेनं स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. पंखुरी अवस्थीलाही शोषण करणा-या व्यक्तीला योग्य धडा शिकवल्याचा गर्व आहे. पंखुरी म्हणाली, यापूर्वी माझ्यात याविरोधात उभे राहण्याची हिंमत नव्हती, मात्र मी आता शोषणाविरोधात उभी राहते. बंगळुरूत मित्रांसोबत होती. मी स्कर्ट परिधान केला होता. त्याच वेळी एक व्यक्ती माझ्याजवळ आला आणि त्यानं माझ्या मांड्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्याच क्षणी मला राग अनावर झाला नि मी त्याच्या कानशिलात भडकावली. पंखुरी लवकरच 'क्या कुसूर है अमला का ?' या हिंदी मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका तुर्की मालिका फातमागुलचं हिंदी रुपांतर आहे. क्या कुसूर है अमला का ? ही मालिका एका तरुणीच्या आयुष्यात येणा-या चढ-उतारांवर आधारित आहे. या मालिकेत काम करण्यास मिळाल्यानं मी गर्व अनुभव करते. मी आनंदी आहे की क्या कुसूर है अमला का ? या मालिकेत मला महत्त्वाची भूमिका मिळणार आहे, असंही पंखुरी म्हणाली आहे. या मालिकेत पंखुरीसोबतच राजवीर सिंह, अनंत जोशी, राजेश खट्टर, अक्षय आनंद आणि कस्तूरी बॅनर्जी यांची प्रमुख भूमिका असणार आहे. क्या कुसूर है अमला का ? ही मालिका 3 एप्रिल 2017पासून प्रसारित होणार आहे. पंखुरीनं क्या कसूर है अमला का? च्या सेटवर दिलखुलास वक्तव्यं केली आहे. ती म्हणाली, भारतात मुंबई हे एक सुरक्षित शहर आहे. दिल्ली, बंगळुरू, चंडिगढ आणि नोएडामध्ये मी राहिली असून, इतरही काही शहरांमध्ये मी वास्तव्य केलं आहे. हे सर्व शहर महिलांसाठी सुरक्षित आहेत, असं मी म्हणणार नाही. दिल्लीत वास्तव्याला असताना मेट्रोनं कॉलेजला जात होती. त्यावेळी अशा अनेक घटना अाजूबाजूला घडत होत्या. मात्र त्यावेळी ते प्रकार समजण्याच्या पलिकडचे होते. शहरं ही रात्री मुलींसाठी सुरक्षित नसतात. तसेच न घाबरता या शहरांत रात्रीचं बाहेर पडण्याचा विचारही करू शकत नाही. पंखुरी अवस्थीनं 2 मार्च 2015ला रजिया सुल्तान या मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत तिने नकारात्मक भूमिका साकारली होती. ही मालिका अँड टीव्हीवर सोमवार ते शुक्रवार रात्री 7.30 वाजता प्रसारित होत होती.