शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या ५९ शाळा मोबाइल डिजिटल

By admin | Updated: March 23, 2017 00:15 IST

एरंडोल : खडू व फळ्याची जागा घेतली आता टॅब व प्रोजेक्टरने, विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद

एरंडोल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये ‘खडू व फळा’ या संकल्पनेची जागा आता टॅब व प्रोजेक्टरद्वारे अध्यापन पद्धतीने घेतलेली दिसून येते. या नव्या तंत्रामुळे शिक्षण व अध्ययन आनंददायी झाले आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची संख्या ८४ आहे. त्यापैकी २५ शाळा डिजिटल झाल्या असून, ५९ शाळा मोबाइल डिजिटल आहेत.प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमांतर्गत १०० टक्के शाळा प्रगत होणे आवश्यक आहे. त्यासाठी अध्यापनाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळा डिजिटल होणे व अध्यापनामध्ये ई-लर्निंगचा वापर करणे गरजेचे आहे. यासाठी गटशिक्षणाधिकारी एन.एफ. चौधरी, त्यांचे सहकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास पाटील यांच्यासह शिक्षकांनी चंग बांधला आहे.एरंडोल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक संख्या ३६६ असून, त्यापैकी ४५ शिक्षक तंत्रस्रेही झाले आहेत. उर्वरित शिक्षकांसाठी तालुकास्तरावर प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.डिजिटल शाळांमध्ये संगणक  ई- लर्निंग साहित्य, स्मार्ट टी.व्ही., टॅबलेट, प्रोजेक्टर इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. त्यांचा वापर अध्यापनासाठी होत आहे. गुणवत्तावाढीसाठी  ई-लर्निंगचा वापर  झाला आहे. ४५ शिक्षकांनी तंत्रस्रेही प्रशिक्षण घेऊन अध्यापनात नवतंत्र ज्ञानाचा वापर सुरू आहे. वर्गनिहाय  सॉफ्टवेअर उपलब्ध करून अध्यापन सुरू आहे. शैक्षणिक अ‍ॅप्स, शैक्षणिक व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखविले जातात. ‘खडू व फळा’ या संकल्पनेऐवजी टॅब व प्रोजेक्टद्वारे अध्यापन सुरू आहे. दृकश्राव्य माध्यमाचा वापर केल्यामुळे अध्ययनात विद्यार्थ्यांना आनंद वाटत आहे. व्हिडिओच्या माध्यमातून जगातील, देशातील काही क्षेत्रे व ठिकाणे पाहिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या लक्षात चिरकाल राहते. उदा. किल्ले, धरणे, पिके, वेशभूषा.तंत्रस्नेही प्रशिक्षण घेतलेले शिक्षक अध्यापनात नवतंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. उर्वरित ५९ शाळांमध्ये अ‍ॅण्ड्राईड मोबाइल व मॅग्निफायर ग्लास यांचा वापर करून अध्यापन सुरू आहे. अशा प्रकारे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व ८४ शाळांमध्ये डिजिटलचे नवे वारे वाहत आहेत.५९ मोबाइल डिजिटल शाळांमध्ये मोबाइलचा वापर करून अध्यापन केले जाते. शाळा डिजिटल होण्यासाठी सन २०१६-१७ मध्ये सात लाख ७५ हजार रुपये लोकसहभागातून घेण्यात आले. शासनाकडून काही शाळांना ई-लर्निंग साहित्य, प्रोजेक्टर, टॅब उपलब्ध   करून देण्यात आले आहे. अजूनही लोकसहभागातून १०० टक्के शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. एरंडोल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा डिजिटल होण्यासाठी गावातील दानशूर व्यक्ती, शिक्षणप्रेमी नागरिकांनी पुढे येण्याची प्रतीक्षा आहे. सर्वांनी डिजिटल होणे काळाची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल करण्याची जबाबदारी केवळ शासन व प्रशासनाची नसून सर्वांची आहे. यासाठी सर्वांनी खारीचा वाटा उचलून ही डिजिटल क्रांती करू या, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.१०० टक्के शाळा डिजिटल करण्यासाठी अधिकाधिक लोकसहभाग मिळविला जाईल. प्रेरणासभा घेऊन जनतेचा सहभाग घेण्यासाठी नियोजन करण्यात येईल. अध्यापनात ई-लर्निंगचा वापर केल्यास गुणवत्तेत वाढ होते.-एन.एफ.चौधरी,गटशिक्षणाधिकारी,पंचायत समिती, एरंडोल कासोदा बीटमध्ये जिल्हा परिषदेच्या १२ प्राथमिक शाळा डिजिटल आहेत. त्यात उत्राण, अंतुर्ली, निपाणे, भातखेडे, बाह्मणे, आडगाव, कासोदा, फरकांडे, जवखेडेसीम, नांदखुर्द, खडकेसीम, पिंप्रीसीम या शाळांचा समावेश आहे.-विश्वास पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी, कासोदा बीट, ता. एरंडोल