शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. सभापतीपदासाठी खडसे व महाजन यांच्यात जोरदार रस्सीखेच

By admin | Updated: April 1, 2017 19:54 IST

महाजन गटाचे चारही सभापती होतील, असे संकेत मिळाल्यानंतर खडसे गटाचे 13 सदस्य अज्ञात स्थळी रवाना झाले.

जळगाव : जिल्हा प्रिषदेचे सभापतीपद आपल्या मर्जीतल्या सदस्यांना मिळावे यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यात शनिवारी जोरदार रस्सीखेच झाली. अखेर महाजन गटाचे चारही सभापती होतील, असे संकेत मिळाल्यानंतर खडसे गटाचे 13 सदस्य अज्ञात स्थळी रवाना झाले. यातच जि.प.सभागृहात संख्याबळासाठी महाजन गटाने भाजपाचे 20, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य आपल्या बाजूने करीत खडसे गटावर दबाव आणला. त्यामुळे खडसे गट बॅकफूटवर गेला आणि अखेर सभापतीपदी महाजन गटाच्या चारही सदस्यांची नियुक्ती झाली. त्यात काँग्रेसच्या वाटय़ालाही सभापतीपद देण्यात आले आहे. सभापतीपदाची निवड शनिवारी दुपारी 3 वाजता जि.प.मध्ये विशेष सभेत करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी 10.40 वाजता जलसंपदामंत्री शासकीय विश्रामगृहात  चर्चेसाठी दाखल झाले. नंतर एकनाथराव खडसे व इतर भाजपाचे नेते आले. यात खडसेंनी सभापतीपदासाठी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आर.जी.पाटील यांची पत्नी काँग्रेसच्या अरुणा पाटील यांच्या नावासाठी आग्रह धरला. पण महाजन यांनी अरुणा पाटील यांच्याऐवजी दिलीप युवराज पाटील यांना सभापतीपद दिले जावे, अशी भूमिका मांडली. खडसे मात्र त्यावर सहमत झाले नाही. सभागृहात मतदान झाल्यास मदत व्हावी यासाठी भाजपातर्फे राष्ट्रवादीचे आत्माराम कोळी व मिना रमेश पाटील यांना बोलावण्यात आले. तसेच शिवसेनेचे तीन सदस्य सभागृहात उपस्थित राहणार असल्याचे खडसे गटास कळले. त्यामुळे खडसे गटाने माघार घेतली व खडसे गटाचे सर्व 13 सदस्य शेवटी जि.प.सभागृहात सभापती निवड सभेला दुपारी 3 वाजता दाखल झाले. महाजन गटाचे चौघे सभापतीजि.प.सभापतीपदी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या गटातील रजनी जगन्नाथ चव्हाण, प्रभाकर गोटू सोनवणे व पोपट भोळे यांची बिनविरोध निवड झाली. तर काँग्रेसचे दिलीप युवराज पाटील यांनाही महाजन यांच्या पुढाकाराने जि.प.मध्ये सभापतीपद मिळाले.