शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

झंवरची सिगारेटची ‘तलफ’ त्यातच पोलिसांची ‘झडप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:20 IST

सुनील पाटील जळगाव : कोणतेही व्यसन हे वाईटच असते, असे वैद्यकीय शास्त्र सांगते. बीएचआर घोटाळ्यातील मास्टर माईंड सुनील झंवर ...

सुनील पाटील

जळगाव : कोणतेही व्यसन हे वाईटच असते, असे वैद्यकीय शास्त्र सांगते. बीएचआर घोटाळ्यातील मास्टर माईंड सुनील झंवर यालाही सिगारेटचे व्यसन अर्थात तलफच घातक ठरली. सिगारेटचा झुरका ओढण्यासाठी तो गॅलरीत आला आणि पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला कॅमेऱ्यात कैद केले. तो झंवरच आहे का? याची खात्री करण्यासाठी फोटो वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले. वरिष्ठांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर पोलिसांनी घरावर फोकस केला. सकाळी १० वाजता घरातून बाहेर निघाल्यावर कारमध्ये बसण्याच्या तयारीत असतानाच त्याच्यावर झडप घातली. अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलोच याची पक्की खात्री पटताच झंवर गार झाला.

पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी २६ रोजी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके व तपासाधिकारी पोलीस निरीक्षक सुचेता खोकले १३५ जणांचा ताफा घेऊन जळगावात धडकले होते. त्यादिवशीच जितेंद्र कंडारे व सुनील झंवर एकाच वेळी जळगावातून निसटले. २६ नोव्हेंबर ते १० ऑगस्ट २०२१ असे २५८ दिवस पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. दोन वेळा तो थोड्या मिनिटासाठी निसटला होता. दरम्यानच्या काळात त्याने पुणे सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला, मात्र त्याला दिलासा मिळालाच नाही. त्यामुळे त्याची भागमभाग सुरुच होती.

मोबाईल सीम बदलले अन‌् घात झाला

सुनील झंवर हा सतत अहमदाबाद, इंदूर व उज्जैन असाच फिरत होता. या काळात त्याने आपला संपर्क कोणाशीच येणार नाही, खास करुन मोबाईलमुळे पकडले जाणार नाही याची काळजी घेतली. अशातच सध्या वापरत असलेल्या मोबाईलमधील सीम कार्ड जुन्या मोबाईलमध्ये टाकले अन‌् त्याचे तात्काळ लोकेशन पोलिसांना मिळाले. त्यामुळे वेळ वाया न घालवता त्याच्या मागावर असलेले उपनिरीक्षक रवींद्र गवारी व पोलीस नाईक शिरीष गावडे यांना ही माहिती कळविण्यात आली. या दोघांनी अगदी जुनी चारचाकी घेतली आणि उज्जैन गाठले. तेथून तो नाशिकला येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे अटक करण्याची घाई केली नाही. त्याच्या वाहनाच्याच मागे त्यांचे वाहन लावले. थेट ४७२ कि.मी. प्रवास करुन रात्री २.३० वाजता झंवर नाशिक येथे पोहचला. तो ज्या घरी गेला त्या घराच्या बाहेर पोलिसांनी रात्रभर पहारा दिला. सकाळी १० वाजता सिगारेटचा झुरका घेण्यासाठी गॅलरीत आला आणि तेव्हाच त्याला पोलिसांनी कैद केले. यावेळी पंचवटी पोलिसांची मदत घेण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रात्री १० वाजता त्याला पुण्यात आणण्यात आले.