शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

झांबरे विद्यालय आणि अनुभूती स्कूल विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 01:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या जैन ज्युनियर चॅलेंज चषक क्रिकेट स्पर्धेत ए.टी.झांबरे विद्यालय आणि अनुभूती स्कूलने विजय मिळवला. मंगळवारी अनुभुती स्कूलच्या मैदानावर सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात झांबरे विद्यालयाने रायसोनी स्कूलचा २ गडी राखून पराभव केला.  रायसोनी ...

ठळक मुद्दे३५ तेजस कोळी याने केलेल्या ३५ धावांच्या जोरावर झांबरे विद्यालयाने सोपा विजय साकारला३९ पोदार स्कूलच्या गोलंदाजांनी अवांतर धावा दिल्या. त्यामुळे अनुभूती स्कूलचा विजय सोपा झाला.३ संयम वेद याने ३ गडी बाद करत अनुभूतीला विजय मिळवून दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या जैन ज्युनियर चॅलेंज चषक क्रिकेट स्पर्धेत ए.टी.झांबरे विद्यालय आणि अनुभूती स्कूलने विजय मिळवला. मंगळवारी अनुभुती स्कूलच्या मैदानावर सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात झांबरे विद्यालयाने रायसोनी स्कूलचा २ गडी राखून पराभव केला.  रायसोनी स्कूलने प्रथम फलंदाजी करताना १८.४ षटकांत सर्वबाद ७६ धावा केल्या. त्यात अर्पित शुक्ला याने ३५ धावांचे योगदान दिले. त्याशिवाय एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. झांबरे विद्यालयाच्या आतिक तडवी याने सर्वाधिक ३ गडी बाद केले. चैतन्य बडगुजर आणि यश शिरसाळे यांनी प्रत्येकी २ गडी बाद करत त्याला साथ दिली. प्रत्युत्तरात विजयासाठी आवश्यक असलेले ७७ धावांचे आव्हान झांबरे विद्यालयाने १९.३ षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. सामनावीर तेजस कोळी याने सर्वाधिक नाबाद ३५ धावा आणि मनीष लाडने नाबाद ७ धावा केल्या. रायसोनी स्कूलच्या संस्कार भावसार याने ११ धावा देत सर्वाधिक ४ गडी बाद केले.  विवेक सावंत याने २, तर आलोक शाह आणि प्रतीक द्विवेदी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. दुसºया सामन्यात अनुभूती स्कूलने पोदार इंटरनॅशनल स्कूलविरुद्ध २५ षटकांत ८९ धावा केल्या. सचिन पाटील याने १४ आणि मानस चौहान याने १३ धावांचे योगदान दिले. मात्र पोदार स्कूलच्या गोलंदाजांनी दिलेल्या अवांतर ३९ धावांमुळे अनुभूती स्कूलच्या धावसंख्येत मोठी भर पडली. पोदार स्कूलच्या सर्वेश देसले, सिद्धांत हरणे, देवराज भांडारकर आणि जयवीर परिहार यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात पोदार स्कूलचा संघ १६ षटकांत ४९ धावांवर तंबूत परतला. अनुभूती स्कूलच्या संयम वेद याने ३ गडी बाद केले.वीरेंद्र गट्टानी याने २ गडी बाद करत त्याला साथ दिली. विवेक सुराणा आणि वेदांत राठोर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.