ठळक मुद्देनैसर्गिक रंगांचा केला वापरबेटीबचावचाही दिला संदेश
खडकदेवळा - पाचोरा शहरातील तलाठी कॉलनीतील रहिवासी सोमेश विजय पाटिल या युवकाने टाकाऊ कागदापासुन इको फ्रेंडली गणपती साकारुन पर्यावरण तसेच बेटी बचावचा संदेश दिला आहे. या गणपतीची उंची 3 फुट इतकी आहे. हा गणपती साकारण्यासाठी सोमेशला चार दिवस लागले.यासाठी टाकाऊ कागदाचा तसेच डिंक,फेविकॉल, खळ आदी साधनांचा वापर करण्यात आला आहे. तसेच नैसर्गीक रंगांचाही वापर करण्यात आला आहे. या गणपतीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासह बेटी बचाव चा संदेशही देण्यात आला आहे. अनेक गणेश भक्त हा इको फ्रेंडली गणपती पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत.