शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

मित्राचा साखरपुडा आटोपून येणा-या जळगावच्या तरुणाला महामार्गावर चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 20:32 IST

मित्राचा साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून घरी येत असताना समोरील वाहनांना विरुध्द दिशेने ओव्हरटेक करताना दुचाकी घसरल्याने मागून आलेल्या भरधाव आयशर ट्रक खाली चिरडून शेख जावेद शेख गफूर (वय २६, रा.आझाद नगर, मेहरुण, जळगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर शेख अल्ताफ शेख अतीक हा जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजता महामार्गावर मुसळी (ता.धरणगाव) फाट्याजवळ घडली.

ठळक मुद्दे मुसळी फाट्याजवळ अपघात  ओव्हरटेक करताना दुचाकी घसरल्याने अंगावरुन गेला ट्रकट्रक चालकाला घेतले ताब्यात

आॅनलाईन लोकमत जळगाव दि, १२: मित्राचा साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून घरी येत असताना समोरील वाहनांना विरुध्द दिशेने ओव्हरटेक करताना दुचाकी घसरल्याने मागून आलेल्या भरधाव आयशर ट्रक खाली चिरडून शेख जावेद शेख गफूर (वय २६, रा.आझाद नगर, मेहरुण, जळगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर शेख अल्ताफ शेख अतीक हा जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजता महामार्गावर मुसळी (ता.धरणगाव) फाट्याजवळ घडली.याबाबत पाळधी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेख जावेद व शेख अल्ताफ हे दोन्ही जण कासोदा येथून दुचाकीने (क्र.एम.एच.१९ व्ही.आर.७०३३) जळगावला येत असताना मुसळी फाट्याजवळ समोरील वाहनांना विरुध्द दिशेने ओव्हरटेक केल्यानंतर साईडपट्टीवरुन दुचाकी रस्त्यावर चढविताना घसरली व त्याच वेळी मागून आलेल्या कापसाच्या गाठी घेऊन येणा-या आयशर ट्रकने (क्र.एम.एच.१८ बी.ए.०५११) शेख जावेद याला चिरडले तर शेख अल्ताफ यालाही जोरदार धक्का बसला. या अपघातात जावेद हा जागीच गतप्राण झाला. ट्रक चालकाला घेतले ताब्यातया अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पाळधी दूरक्षेत्राचे सहायक निरीक्षक विजय देशमुख व सहका-यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त तरुणांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले तर ट्रक चालक गुलाब महाडीक (रा.मालेगाव, जि.नाशिक) व क्लिनर दिलीप हरीभाऊ मोरे (रा.कळवाडी, ता.मालेगाव) या दोघांना वाहनासह ताब्यात घेतले. ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जावेदचा लाकडाचा व्यवसायजावेद हा अविवाहित होता. लाकूड विक्री व मजरी असे दोन्ही कामे तो करत होता. वडील शेख गफूर शेख छोटेमिया हे मजुरी करतात तर मोठा भाऊ मेहमूद हमाली, दुसरा भाऊ वसीम हा मिस्तरी काम तर जुबेर हा चालक आहे. जावेद हा सर्वात लहान होता.आई अरमानबी या गृहीणी आहेत. जावेदच्या मृत्यूची बातमी कळताच मेहरुणमधील लोकांना जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्याच्या मृत्यूने मेहरुणमध्ये शोककळा पसरली आहे.