शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

अडावदनजीक जळगावचा तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2017 01:15 IST

मित्र जखमी : घरमालकाच्या पुतणीच्या लग्नाला जातानाची घटना

जळगाव : घरमालकाच्या पुतणीच्या लग्नाला जात असताना दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मिलिंद धनराज चौधरी (27) हा तरुण ठार झाला. तर त्याचा मित्र किशोर काशिनाथ शेकोकार (25) दोन्ही रा. सप्तशृंगी कॉलनी, जळगाव हा जखमी झाला. हा अपघात सोमवारी दुपारी साडेबारा वाजता चोपडा तालुक्यातील अडावदनजीक झाला.  मेहरूण परिसरातील सप्तशृंगी कॉलनीमधील  रहिवासी  मिलिंद चौधरी हा आई-वडील व दोन लहान्या भावांसह भाडय़ाने राहत होता. सोमवारी पंचक येथे घरमालकाच्या पुतणीचे लग्न असल्याने  त्यासाठी मिलिंद व त्याचा मित्र किशोर शेकोकार हे दुचाकीवर (एमएच-19-सीजी-0349) गेले होते. त्या वेळी अडावदनजीक समोरुन येणा:या ट्रकची व दुचाकीची धडक होऊन मिलिंदसह मागे बसलेला त्याचा मित्र किशोरही  गंभीर जखमी झाला. त्यांना रुग्णवाहिकेद्वारे जळगावला आणत असताना वाटेतच इदगावनजीक मिलिंदची प्राणज्योत मावळली. जिल्हा रुग्णालयात आक्रोश मिलिंदचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर घटनेची माहिती मिळताच त्याच्या वडिलांसह दोघं भाऊ व मित्रांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. येथे त्याच्या वडिलांनी व भावांनी मृतदेह पाहताच आक्रोश केला. तसेच मित्रांनाही शोक अनावर झाला होता. संध्याकाळी शवविच्छेदन होईर्पयत त्याचे मित्र जिल्हा रुग्णालयात थांबून होते. सप्तशृंगी कॉलनीतही घटनेची माहिती मिळताच तेथे शोकमग्न वातावरण होते. सर्वाशी जिव्हाळाअविवाहित असलेला मिलिंद हा औद्योगिक वसाहत परिसरातील एका कंपनीत कामाला होता तर त्याचे वडील व दोघे भाऊ रिक्षा चालवितात. मनमिळावू स्वभाव असलेल्या मिलिंदचे मित्रपरिवारात सर्वाशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या आकस्मित मृत्यूने मित्रांनाही धक्का बसला आहे. आईदेखील गेली होती लग्नालामिलिंद ज्या लग्नाला जात होता, त्याच लग्नाला त्याची आईदेखील दुस:या वाहनाने गेली होती. घटनेची माहिती मिळताच त्याची आई घरी परतली व त्यांनीही हंबरडा फोडला. या घटनेतील जखमी किशोर शेकोकार याला जळगावातीलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.