शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
2
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
3
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
4
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
5
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
6
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
7
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
8
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
9
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
10
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
11
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
12
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
13
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
14
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
15
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
16
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
17
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
18
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
19
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
20
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू

नातेवाईकांंना फोन करीत युवकाने केली आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 21:53 IST

नांदुपिंप्री येथील पुलावरुन तापी नदीत घेतली उडी ; रावेर येथे शोककळा 

रावेर : शहरातील श्री हनुमान वाड्यातील रहिवासी व एका आरोग्य विमा कंपनीतच सेवारत असलेल्या २८ वर्षीय अविवाहित युवकाने आतेभावाला भ्रमणध्वनीवरून कळवत निंभोरासीम ते नांदुपिंप्री दरम्यान असलेल्या पुलावरून तापी नदीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना ३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शहरातील युवावर्गात  शोककळा पसरली आहे.    याबाबत रावेर पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील हनुमान वाड्यातील रहिवासी असलेला दिपक प्रकाश माळी (वय २८) हा बीकॉम पदवीधर युवक एका आरोग्य विमा कंपनीत सेवारत होता. दरम्यान, आपले दैनंदिन कामकाज आटोपून गुरूवारी सायंकाळी घरी येवून बाहेर गेला असता त्याने वडीलांना भ्रमणध्वनीवरून फोन करत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते.   दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा त्याने त्याचा आतेभाऊ मनोज महाजन यांना भ्रमणध्वनीवरून तापी नदीच्या पुलावर मोटारसायकल, बॅग व मोबाईल ठेवला असून तापी नदी पात्रात उडी मारून आत्महत्या करीत असल्याचे कळवले व लगेच उडी मारली. रात्री उशिरापर्यंत धुरखेडा येथील मच्छीमारी व्यावसायिकांनी शोध मोहीम राबवली. मात्र ती विफल ठरली.   शुक्रवारी सकाळी धुरखेडा येथील ज्ञानेश्वर बेलदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचा मृतदेह तापीनदीच्या खोल पात्रातून बाहेर काढला. रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ. एन. डी. महाजन यांनी शवविच्छेदन केले. शोकाकुल वातावरणात त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.  कोरोनाच्या लॉकडाउनपुर्वी जळगावला एका बँकेत असलेली सेवा संपुष्टात आल्यापासून बेरोजगारीच्या मानसिक तणावात तो होता. पश्चात आई वडील, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. या घटनेबाबत  रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अर्जून सोनवणे पुढील तपास करीत आहेत.