लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात साधारण १५ फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णसंख्या अगदीच झपाट्याने वाढली असून ही दुसरी लाट मानली जात आहे. या साधारण दीड महिन्यांच्या कालावधी २० हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे दुसऱ्या लाटेत संसर्गाचे प्रमाणही जळगाव शहरात थेट ४्र० टक्क्यांवर पोहाचले आहे. यात विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत तरूणांचे यंदा बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय लक्षणांमध्येही बदल होत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाचा संसर्ग अगदीच झपाट्याने वाढला आहे. मध्यंतरी शहरातील बाधितांचे प्रमाण काही दिवस हे थेट ५२ टक्कयांवर गेले होते. शहरातच सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. शिवाय एक व्यक्ती नव्हेत तर कुटुंबच्या कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील अनेक कुटुंब बाधित झाले आहेत.
साधी लक्षणे
तरूणांमध्ये एक दिवस साधी सर्दी, साधा ताप, डोकदुखी असे काही लक्षणे येतात, नंतर ते नसतात मात्र, टेस्ट केल्यानंतर ते बाधित येतात अशी काही लक्षणे समोर येत असल्यचे शिवाय तरूणांचे प्रमाणही यंदा अधिक असल्याचे काही तज्ञ सांगतात.
कमी वयाचे मृत्यू चिंता वाढविणारे
जळगावात मृतांची संख्या १५०० पेक्षा अधिक झाली आहे. गेल्या दीड महिन्यात ५० वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या रुग्णांचे मृत्यू वाढले आहेत. यात अगदीच २४, ३८, ४०, ४५ अशा वयोगटातील रुग्णांचेही मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. यात शासकीयसह खासगी यंत्रणेतही मृतांची संख्या वाढली आहे. गेल्या काही दिवसात मृत्यूंमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे चित्र आहे. सोमवारी एकाच दिवसात ११ बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात जळगाव शहरातील पाच बाधितांचा समावेश आहे.
जीएसीतील मृत्यू
५५ वर्षांपेक्षा अधिक : ४०७
५५ वर्षापेक्षा कमी : १४३
मधूमेह असलेले रुग्ण : २७७
जिल्ह्यातील मृत्यू
एकूण मृत्यू १५०१
५० वर्षांपेक्षा अधिक : १३३०
५० वर्षांपेक्षा कमी १७१
दुसऱ्या लाटेतील रुग्ण
१९०००