शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चंपावती नदीच्या पुरात तरूण वाहून गेला

By admin | Updated: June 8, 2017 13:06 IST

चहार्डी परिसरात सकाळी मृतदेह सापडला

ऑनलाईन लोकमत

चोपडा ,दि.8 : बुधवारी  रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चंपावती नदीला पूर आला. या पुरात चहार्डी येथील तुषार गुलाबराव न्हावी (सोनवणे) (27) हा तरूण वाहून गेला. त्याचा मृतदेह सकाळी चहार्डीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कोल्हापुरी बंधा:यात सापडला.
चहार्डी येथील काळकमपूरा भागातील रहिवासी गुलाबराव सुकलाल न्हावी  आणि अनिता न्हावी यांचा एकुलता एक मुलगा  तुषार हा  7 रोजी रात्री केश कर्तनाचा व्यावसाय आटोपून रात्री घरी जात होता. चंपावती नदी पार करत असतांना नदीला पुर आला. त्यात तो वाहून गेला. त्याच्या  नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जात  एक किलोमीटर अंतरावर  असलेल्या कोल्हापुरी बंधा:यात अडकला होता. 
रात्री वीज पुरवठा बंद असल्याने व नदीला  पूर आल्याने तुषार दुकानावरच असावा असे त्याच्या आई वडिलांना वाटले. मात्र सकाळी कोल्हापुरी बंधा:यात अडकलेले लाकडे काढायला गेलेल्या इतरांच्या लक्षात ही गोष्ट आली. ही बातमी  गावात वा:यासारखी पसरली. गावातील ग्रामस्थानी बंधा:याकडे धाव घेतली. सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास तुषारचा मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.
  घटनेचे वृत्त कळताच जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रा.नीलम पाटील या  कोल्हापुरी  बंधा:याजवळ पोहचल्या. तहसीलदार दीपक गिरासे हे ही घटनास्थळी पोहचले .
4 लाखाची मिळणार मदत : तहसीलदार
दरम्यान, याबाबत पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे महसूल विभागाकडून मृत तुषार च्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे तहसीलदार दीपक गिरासे यांनी सांगितले.