शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मद्यप्राशनसाठी पैसे न दिल्याने तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 20:22 IST

पाळधी येथील घटना : दोघांनी टाकला डोक्यात लोखंडी रॉड

धरणगाव/पाळधी  : येथील अंडाभूर्जीची गाडी लावणाऱ्या तीस वर्षीय युवकाचा लोखंंडी रॉड डोक्यात टाकून खून केल्याची घटना २७ रोजी मध्यरात्री पाळधी येथे घडली. आम्हाला मद्यप्राशनासाठी पैसे दे अशी मागणी दोघा आरोपींनी केली होती. नकार दिल्याने हे भांडण झाले. या घटनेतील दोघा आरोपींना पोलिसांनी एका तासात अटक केली.पाळधी ता.धरणगाव येथील पथराड रस्त्यावरील पाटचारीजवळ ज्ञानेश्वर गंभीर पाटील (वय ३०) मूळ रा.डांगरी ता.अमळनेर यांचा गेल्या तीन-चार महिन्यापासून अंडापाव-भुर्जीची गाडी आहे. यावेळी आरोपी बबलू चैत्राम कोळी (वय २६) व बळीराम मांगो कुंभार (सिल्लोडकर) (वय २९) ( रा.पाळधी) या दोघांनी ज्ञानेश्वरच्या दुकानात मद्यप्राशन करीत अंडापावा खाल्ला. यानंतर ज्ञानेश्वर पाटील याच्याशी वाद घालून मद्याची मागणी केली. यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. ज्ञानेश्वर ने पैसे देण्यास नकार दिल्याने बबलू कोळी व बळीराम कुंभार या दोघांनी त्याचा डोक्यात जवळच पडलेला लोखंडी रॉड मारुन त्याचा खून केला व तेथून ते पसार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले, पाळधी दूरक्षेत्रचे सपोनि हनुमंत गायकवाड व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती घेवून भादंवि ३०२, ३४ अन्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.एका तासात आरोपी अटकेतया घटनेचे वृत्त समजताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गोरे, चोपडा विभागाचे डीवायएसपी सौरभ अग्रवाल यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून साहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्यांशी चर्चा केली. लगेच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून आरोपी बबलू कोळी व बळीराम कुंभार यांना एका तासात अटक केली.आरोपींना १ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीया घटनेतील संशयीत आरोपी बबलू कोळी व बळीराम कुंभार यांना धरणगाव न्यायालयात हजर केले असता न्या. सु.दा.सावरकर यांनी १ डिसेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली.फोटो--१) मयत ज्ञानेश्वर पाटील२)आरोपी बबलू कोळी व बळीराम कुंभार यांना अटक केल्यानंतर विचारपूस करतांना सपोनि पवन देसले व स्टाफ.