शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

तापीच्या पुलावरुन तरुणाने घेतली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 19:53 IST

आत्महत्येचा थरार : भुसावळ येथील घटना, ‘तो’ बनला सुसाइड पाॅईन्ट

भुसावळ :  येथील तापी नदी पुलावरून एका तरुणाने उडी घेऊन सोमवारी आत्महत्या केली. ही घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. मात्र घटना कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली यावरून शहर पोलीस स्टेशन व फैजपूर पोलीस स्टेशन यांच्यात तब्बल तीन तास घोळ सुरू होता. तर मयताच्या  खिशातून निघाल्या चिट्ठीवरून प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.आत्महत्या केलेल्या तरुणाच्या हातावर प्रशांत लिहिले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तर अंगात टी-शर्ट व दाढी ठेवलेल्या या तरुणासंदर्भात पोलीस ओळख पटवण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न करीत होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मृतदेह नदीतून बाहेर काढला. शहर पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. मात्र रात्री उशिरापर्यंत कोणत्याही पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली नव्हती.तापी पुलावरुन आत्महत्येची  महिनाभरातील तिसरी घटना१ ऑक्टोबर रोजी विरेन्द्र रामा कोळी यांनी तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती . तर १४ रोजी एका महिलेने येथेच आत्महत्या केली होती. ती घटना फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. तर सोमवारी तरुणाने  येथे  आत्महत्या केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली  जात आहे.केली वाहतूक सुरळीतघटना घडली त्यावेळी  शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  बाबासाहेब ठोंबे हे दुर्गा देवी विसर्जन बंदोबस्तात व्यस्त होते.  त्यांनी लागलीच  पोलीस उपनिरीक्षक वैभव पेटकर , हे. कॉ. नागेंद्र तायडे , संजय पाटील , महेंद्र ठाकरे , विशाल साळुंखे, राजकिरण झाल्टे आदींनी घटनास्थळी पाठवले. या पथकाने तब्बल तीन तास वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.पोलीस पाटील म्हणतात घटना फैजपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतदरम्यान  , घटना घडल्या नंतर शहर पोलिसांनी किरण वानखेडे रा. अकलूद , ता. यावल पोलीस पाटील यांना  माहिती दिली  व त्यांना घटनास्थळी उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी ही घटना फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीत असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशन व  फैजपूर  पोलीस स्टेशनच्या पोलिसांना दिली.  मात्र दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुलाच्या प्रत्येकी  14 पिलर येतात असा दावा   फैजपूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी केला.  व ही घटना १४ व्या  पिलरच असल्यामुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचे सांगितले . तर पोलीस पाटील वानखेडे यांनी मी पोलीस पाटील पदाची सुत्रे घेतली . त्या वेळेस मला फैजपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १७ भिंती असल्याचे सांगण्यात आले होते , अशी माहिती उपस्थितांना दिली.