शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

गिरणा नदी पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गिरणा नदी पात्रात बुडाल्याने शुभम उर्फ भवरलाल हिरालाल राजपूत (वय २६, रा.हिरा शिवा कॉलनी) ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गिरणा नदी पात्रात बुडाल्याने शुभम उर्फ भवरलाल हिरालाल राजपूत (वय २६, रा.हिरा शिवा कॉलनी) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता निमखेडी शिवारात घडली. शुभम याला पोहता येत नसल्यानेच त्याचा जीव गेल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शुभमच्या मृत्यूची घटना समजताच, शेकडोच्या संख्येने तरुणांनी रुग्णालयात धाव घेतली. मित्र व कुटुंबाचा प्रचंड आक्रोश सुरू होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हा शनिवारी मित्रांसोबत निमखेडी शिवारातील गिरणा नदीत गेलेला होता. तेथे काही लोक पाण्यात पोहत होते. शुभम याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात जायला घाबरत होता. पाण्यात उतरल्यावर खोल खड‌्डयाचा अंदाज न आल्याने त्यातच तो बुडाला. शेजारी पोहणारे तरुण व सोबतच्या मित्रांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून तातडीने शासकीय रुग्णालयात आणले. रस्त्यात त्याचा श्वास सुरू होता. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही मिनिटांतच शंभराच्या वर तरुणांनी रुग्णालय गाठले. अनेक मित्रांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. कुटुंबातील महिलांचा तर प्रचंड आक्रोश सुरू होता.

जन्माला येण्याआधीच बाळाचे पितृछत्र हरपले

शुभम याचे गेल्या वर्षीच लग्न झाले होते. पत्नी प्रतीक्षा गरोदर असून, माहेरी एरंडोल येथे गेलेली आहे. बाळाचा जन्म होण्याआधीच त्याचे पितृछत्र हरपले आहे, तर शुभमही बाळाचे तोंड बघू शकला नाही. त्याच्यापश्चात पत्नी, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. शुभम याचा वाळूचा व्यवसाय होता, असे रुग्णालयात आलेल्या त्याच्या मित्रांकडून सांगण्यात आले.