शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:33 IST

मेहरुण तलावात मृतावस्थेत आढळून आलेल्या १७ वर्षीय तरुणीच्या प्रकरणात विशाल संतोष भोई (२१, रा.रामेश्वर कॉलनी) याला रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी न्यायालयाने त्याला २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, विशाल याने तरुणीला गणपती नगरातून पळवून नेण्यासह कोल्हे हिल्स बंगल्याच्या परिसरात नेल्याचेही उघड झाले असून पोलिसांकडे तसे पुरावेही मिळून आलेले आहेत.  

ठळक मुद्देसहा दिवस कोठडीकोल्हे हिल्स परिसरातही फिरविले

जळगाव : मेहरुण तलावात मृतावस्थेत आढळून आलेल्या १७ वर्षीय तरुणीच्या प्रकरणात विशाल संतोष भोई (२१, रा.रामेश्वर कॉलनी) याला रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी न्यायालयाने त्याला २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, विशाल याने तरुणीला गणपती नगरातून पळवून नेण्यासह कोल्हे हिल्स बंगल्याच्या परिसरात नेल्याचेही उघड झाले असून पोलिसांकडे तसे पुरावेही मिळून आलेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबापुरात राहणारी तरुणी व तिची आई रविवारी दि.१९ रोजी सकाळी ११ वाजता गणपती नगरातील रोहीत मनोहरलाल नाथानी यांच्याकडे धुणीभांडी करायला गेले होते. तेथील सीसीटीव्ही कॅमेºयातील रेकॉर्ड व प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार ही तरुणी विशालसोबत गेली होती. त्यानंतर नाथानी यांच्याकडेच काम करणाºया हरिविठ्ठल नगरातील एका महिलेला ही तरुणी कोल्हे हिल्स परिसरातील बंगल्याकडे दुपारी चार वाजता विशालसोबत दिसली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी ती मेहरुण तलावात नातेवाईकांना मृतावस्थेत आढळून आली. तरुणीने त्याच दिवशी तलावात आत्महत्या केल्याचा संशय असून त्याला विशाल हाच जबाबदार असल्याने त्याच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अपहरणाच्याच गुन्ह्यात दोन कलम वाढविले  दरम्यान, १९ रोजीच या प्रकरणात तरुणीला फूस लावून पळविले म्हणून अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता, त्यात आता विशाल याला आरोपी करण्यासह वाढीव ३०६ व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियिम २०१२ चे कलम १२ चे कलम (पोक्सो) लावण्यात आले. चौकशीत आणखी कलम वाढण्याची शक्यता आहे. त्याची वैद्यकिय तपासणी केली जाणार असून यात आणखी कोणाचा सहभाग होता का याचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी विशाल याला न्या.एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला २८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली. दरम्यान, विशाल हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुध्द यापूर्वी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.