शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शॉक लागल्याने तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2017 00:29 IST

अमळनेर : दुभाजकात टाकलेल्या खांबात उतरला वीज प्रवाह

अमळनेर : धुळे  रस्त्यावरील पंचायत  समिती सभापती बंगल्यासमोरील दुभाजकात लावलेल्या विद्युत खांबाचा शॉक लागल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.शहरातून जाणा:या राज्य महामार्गावर टाकलेल्या दुभाजकात विद्युत खांब उभारलेले आहेत. त्या विद्युत खांबातून अनेक वेळा वीज प्रवाह सुरू असतो. याबाबत नागरिकांनी नगरपरिषदेकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र पालिकेच्या दिवाबत्ती विभागाचे याकडे दुर्लक्ष  झाले आहे.   दुभाजकावर लावलेल्या जाळीतून नागरिक ये-जा करत असतात.  सोमवारी रात्री शिव कॉलनी भागातील रहिवासी विलास रमेश लिंगायत (24) हा तरुण पं.स. सभापती बंगल्याकडून पलीकडे असलेल्या मेडिकलवर या दुभाजकात लावलेल्या जाळीतून जात होता. तेथील विद्युत खांबाचा त्याला  शॉक लागला. त्याचा उजवा हात त्या खांबाला चिटकल्याने तो बराच वेळ  लटकलेला होता. त्यानंतर तो खाली पडला. बेशुद्धावस्थेत त्याला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत विलासचा उजवा हात खांद्यातून निखळला आहे. चेह:यावर आणि जिभेवर काळे डाग पडले आहेत. खांद्यावर शस्रक्रिया करावी लागणार आहे. त्यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च येणार आहे. विलासच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे. त्या तरुणाचा सर्व वैद्यकीय खर्च पालिकेने करावा, अशी मागणी विलासच्या कुटुंबाने केली आहे. नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार त्या तरुणावर ओढवल्याचे बोलले जात आहे.  नगरपरिषदेने तत्काळ दुभाजकातील विद्युत खांबांची तपासणी करावी व पुढे अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे. घटनेनंतर वीज वितरण कंपनीचे लाईनमन माधव चौधरी यांनी सोमवारी रात्री या ठिकाणी पाहणी केली. त्या वेळी त्यांनी खांबात वीज प्रवाह नसल्याचे सांगितले होते. मात्र सदर खांब न.प.च्या अखत्यारित येत असल्याने आपण काही करू शकत नसल्याचे त्यांनी उपस्थित नागरिकाना सांगितले होते.                            (वार्ताहर)