शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही पुराचा धोका कायम

By admin | Updated: May 20, 2017 00:49 IST

चहार्डी : वर्षभरात नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही

चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथे असलेल्या कोल्हापुरी बंधा:यामुळे गेल्या वर्षी अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. त्या वेळी भेटीसाठी आलेल्या खासदार रक्षा खडसे यांनी बंधा:याची उंची कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या वर्षाचा पावसाळा सुरू होण्याची वेळ आली तरी बंधा:याची उंची कमी झाली नाही की पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली नाही. दरम्यान, यंदाही  चहार्डीवासीयांना पुराचा धोका कायम आहे.चहार्डी येथे 90 लाख रुपये खचरून कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधला. मात्र त्यात अद्याप थेंबभरही पाणी अडलेले नाही. अजूनही बंधारा हस्तांतरणाच्या लालफितीत  अडकलेला आहे. लघुसिंचन विभागाने आमच्या ताब्यात अजूनही बंधारा हस्तांतरित केला नसल्याचे  ग्रामपंचायतचे म्हणणे आहे. तर  बंधारा ग्रामपंचायतच्या ताब्यात दिल्याचे लघुसिंचन विभागाचे म्हणणे आहे. या दोघांच्या वादात बंधा:यात पाणी तर अडविले गेलेच नाहीच, उलट बंधा:यात कचरा अडकून पावसाळ्यात तेथील पाणी गावात शिरते. गेल्या वर्षी 9 जून 2016 रोजी झालेल्या पावसामुळे बंधा:यातील पाणी गावात शिरले होते. त्यामुळे  अनेकांचे संसार या पाण्यात वाहून गेले होते. त्या वेळी पाहणीसाठी आलेल्या खासदार रक्षा खडसे यांनी बंधा:याची उंची कमी करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. मात्र वर्ष उलटले तरी बंधा:याची उंची कमी झालीच नाही, शिवाय नुकसानग्रस्तांनाही भरपाई मिळाली नाही. त्यामुळे खासदारांचे आश्वासन हवेतच विरल्याची चर्चा आहे.