शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या समस्या कायम ठेवणारे वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपात सत्तेत आलेल्या भाजपकडून वर्षभराच्या आत विकासाचा दावा करण्यात आला होता. पहिले वर्ष भाजपच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपात सत्तेत आलेल्या भाजपकडून वर्षभराच्या आत विकासाचा दावा करण्यात आला होता. पहिले वर्ष भाजपच्या गटबाजीतच वाया गेल्यानंतर ‘२०२०’ हे वर्ष जळगावकरांच्या अडचणी दुर करणारे ठरेल अशी अपेक्षा होती. मात्र, २०२० च्या सुरुवातीला ज्या समस्यांना जळगावकर सामोरे जात होते. त्याच समस्या हे वर्ष समारोपाच्यावेळेसही कायम आहे. त्यामुळे आगामी वर्षात तरी जळगावकरांच्या समस्यांचे ग्रहण सुटून, सत्ताधारी भाजप आपले आश्वासन पुर्ण करेल अशी आशा जळगावकरांना लागून आहे.

महापौर बदलानंतरही समस्या कायम

जानेवारी २०२० मध्ये सीमा भोळ यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारती सोनवणे यांची महापौरपदी निवड करण्यात आली. मात्र, महापौर बदललानंतरही शहराच्या समस्या कायम आहेत.

गो गो वॉटरग्रेस अन‌् कम, कम वॉटरग्रेस

फेब्रुवारी महिन्यात शहराच्या सफाईचे काम पाहणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीच्या कामाबाबत सर्वच पक्षातील नगरसेवकांकडून आलेल्या तक्रारीनंतर वॉटरग्रेसकडून काम थांबविण्यात आले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी एका सुरात ‘गो वॉटरग्रेस, गो’ च्या घोषणा देत आंदोलन केले. मात्र, ऑगस्ट महिन्यात वॉटरग्रेस कंपनीला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पायघड्या घालत, पुन्हा संधी दिली.

टेकाळे गेले कुलकर्णी आले

महापालिकेच्या प्रशासनातही अनेक फेरबदल झाले. मनपा आयुक्त उदय टेकाळे ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर मार्च महिन्यात सतीश कुलकर्णी मनपाचे आयुक्त म्हणून रुजू झाले. दरम्यान, उत्कर्ष गुट्टे, अजित मुठे व मिनीनाथ दंडवते यांचीही बदली झाली. एकाच वेळी प्रमुख अधिकाऱ्यांचा बदल्या झाल्यामुळे मनपातील प्रशासकीय पोकळी निर्माण झाली.

उपायुक्तांनी दाखल केला, महापौर पतींवर गुन्हा

शहराच्या कचऱ्याच्या प्रश्नावर महापौर पती कैलास सोनवणे यांचा उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांच्याशी खटके उडाले. उपायुक्तांनी कैलास सोनवणे यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप करत, सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. काही महिन्यातच उपायुक्त दंडवते यांची मनपातून बदली देखील झाली.

कोरोनाच्या काळात मनपा वैद्यकीय कर्मचारी सरसावले

मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मनपाची सर्व यंत्रणा कोरोनाच्या लढ्यात पुढे सरसावली. मनपा वैद्यकीय विभागाच्या टीमने या संकटकाळात ठामपणे जळगावकरांची सेवा बजावली. महापौर भारती सोनवणे व त्यांचे पती कैलास सोनवणे यांनीही कोरोनाच्या संकटकाळात जळगावकरांना धीर देण्याचा प्रयत्न केला. या संकटकाळात नेहमी भांडत असलेले सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येवून मनपा प्रशासनाला साथ दिली.

उपमहापौरांचा राजीनामा, खडकेंना संधी

उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी ऑक्टोबर महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाने सुनील खडके यांना संधी देत, खडके यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. यासह स्थायी समिती सभापतीपदी राजेंद्र घुगे-पाटील यांची निवड झाली. वॉटरग्रेसकडून ६० नगरसेवकांना हप्ते दिल्याचा अभिषेक पाटील यांच्या आरोपावरूनही मनपातील वातावरण ढवळून निघाले.