शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

यंदा पावसाची 13 टक्के तूट

By admin | Updated: September 30, 2015 23:57 IST

साडेतीन महिन्यात अवघा 58 टक्के झालेला पाऊस सप्टेंबरच्या अखेरीस तब्बल सरासरीच्या 29 टक्के बरसल्याने पावसाची आकडेवारी वाढून थेट 87 टक्क्यांर्पयत गेली.

कागदोपत्री यंदा पावसाची आकडेवारी वाढलेली दिसत असली तरी प्रत्यक्षात टंचाईचे सावट कायम आहे. साडेतीन महिन्यात अवघा 58 टक्के झालेला पाऊस सप्टेंबरच्या अखेरीस तब्बल सरासरीच्या 29 टक्के बरसल्याने पावसाची आकडेवारी वाढून थेट 87 टक्क्यांर्पयत गेली. शासकीय नियमानुसार आणि प्रचलित पद्धतीनुसार आजपासून अर्थात 1 ऑक्टोबरपासून हिवाळा सुरू झालेला आहे. त्यामुळे यापुढे पाऊस पडलाही तरी ती नोंद शासकीय आकडेवारीत गृहीत धरली जाणार नाही.

यंदाचा पावसाळा उशिरानेच सुरू झाला होता. जूनच्या तिस:या आठवडय़ात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. परिणामी पेरण्यादेखील उशिराने झाल्या. त्यानंतर पावसाने ओढ देऊन पुन्हा जुलैच्या दुस:या आठवडय़ात हजेरी लावली. जुलैत ब:यापैकी झालेला पाऊस पुन्हा दोन आठवडे गायब झाला. ऑगस्टमध्ये तुरळक स्वरूपात जिल्ह्याच्या काही भागात बरसला. त्यामुळे पीकं थोडय़ाफार प्रमाणात तग धरून राहिली. त्यानंतर तब्बल महिनाभराने अर्थात 13 सप्टेंबरला पाऊस झाला. तीन ते चार दिवस पडलेल्या पावसाने मागचा बॅकलॉग भरून काढला, परंतु पिकांचे जे नुकसान व्हावयाचे ते झालेच. पावसाअभावी बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस ही पीकं वाया गेली होती. बाजरी, ज्वारी, मका, मिरची, हंगामपूर्व लागवडीचा कापूस ही पीकं थोडीफार हाती येणार होती. ती या पावसाने वाया गेली. त्यामुळे खरीप हंगाम तसा शेतक:यांच्या दृष्टीने ‘कहीं खुशी कहीं गम’ स्वरूपातील राहिला. ही परिस्थिती पाहता सप्टेंबरच्या दुस:या आठवडय़ात जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात नजर आणेवारी 50 पैशांच्या आतच लागू केली. आता पावसाळा अधिकृतरीत्या संपलेला आहे. कागदोपत्री पावसाची आकडेवारी गेल्या वर्षाच्या तुलनेत 13 टक्के अधिक दाखवत आहे. असे असले तरी जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अर्थात दुष्काळी स्थिती कायम आहे. शासन आता यावर काय उपाययोजना करते, शेतकरी आणि सर्वसामान्यांना काय दिलासा देते याकडे आता लक्ष लागून आहे.

सप्टेंबरच्या तिस:या आठवडय़ात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रकल्पांमधील पाणीसाठा तब्बल 20 टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षी 23 सप्टेंबर्पयत पाणीसाठय़ाची टक्केवारी 58 टक्के होती. यंदा ती 76.5 टक्के आहे. 37 लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी 69 टक्के, तर यंदा 76.91 टक्के पाणीसाठा आहे. शिवाय गेल्या वर्षाच्या तुलनेत ओव्हरफ्लो झालेल्या प्रकल्पांची संख्यादेखील यंदा जादा आहे. गेल्या वर्षी 11 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते, तर यंदा 14 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. रंगावली मध्यम प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. शहादा तालुक्यातील दरा प्रकल्पात देखील 100 टक्के तर नंदुरबार तालुक्यातील शिवण प्रकल्पात 37.43 टक्के पाणीसाठा आहे. पाणी अडविल्याने 83 टक्के पाणीसाठा झाला आहे.

तळोदा वगळता सर्वत्र सरासरीपेक्षा कमीच

4जिल्ह्यात केवळ तळोदा तालुक्यातच पावसाने सरासरी ओलांडली. या तालुक्यात सरासरी पजर्न्यमान 772.70 मि.मी. आहे. यंदा प्रत्यक्षात 781.45 मि.मी. पाऊस झाला आहे. त्या खालोखाल नंदुरबार तालुक्यात पाऊस झाला. नंदुरबारची सरासरी 682.8 मि.मी. असताना प्रत्यक्षात 645.13 मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वात कमी पाऊस नवापूर तालुक्यात झालेला आहे. या तालुक्यात पावसाची सरासरी 1165 मि.मी. असताना प्रत्यक्षात 810.66 मि.मी. पाऊस झाला आहे. अशीच स्थिती शहादा तालुक्याचीदेखील आहे. या तालुक्यातदेखील पावसाची तूट जवळपास 200 मि.मी.र्पयत आहे. सरासरी 722.7 मि.मी. एवढी असताना केवळ 533.13 मि.मी. पाऊस झाला आहे. अक्कलकुवा तालुक्यातदेखील पावसाची सरासरी 1075 मि.मी. असताना प्रत्यक्षात 826.21 मि.मी. पाऊस झाला आहे. धडगाव त्या मानाने ब:यापैकी आहे. 813.2 सरासरी पजर्न्यमान असताना यंदा प्रत्यक्षात 758.25 मि.मी. पाऊस झाला आहे.

आणेवारी 50 पैशांच्या आतच

4खरिपातील एकूण पीक परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच अर्थात सहाही तालुक्यांमधील नजर पीक आणेवारी 50 पैशांच्या आत जाहीर केली. त्यानंतर पाऊस झाला आणि पावसाची सरासरी थेट 87 टक्केर्पयत गेली. असे असले तरी पीक वाया गेलेच. त्यामुळे सुधारित पैसेवारी जाहीर करतानाही ती 50 पैशांच्या आतच जाहीर करावी. जेणेकरून जिल्ह्यातील शेतक:यांना दुष्काळी मदतीचा, योजनांचा लाभ मिळू शकेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.