शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

यावल-रावेर तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 20:30 IST

यावल-रावेर तालुक्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.

ठळक मुद्देफैजपूर उपविभागात ७५ टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले२५ टक्के रुग्णांवर उपचार सुरू

वासुदेव सरोदेफैजपूर, ता.यावल : फैजपूर उपविभागात असलेल्या रावेर व यावल तालुक्याची आता कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. या दोन्ही तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75 टक्के झाले आहे. त्यामुळे आता केवळ 25 टक्के रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी दिली. भविष्यातही नागरिकांनी काळजी घेत नियमांचे पालन केल्यास फैजपूर उपविभाग लवकरच कोरोना मुक्त होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.रावेर यावल तालुक्याच्या कोरोना रुग्णाबद्दलची आकडेवारी माहिती अशाप्रकारे आहे.सद्य:स्थितीत यावल तालुक्यातील केवळ 30 बाधित रुग्ण, तर रावेर तालुक्यातील 135 बाधित रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तसेच संशयित म्हणून यावल तालुक्यातील 23, तर रावेर तालुक्यातील 72 असे 95 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील केवळ 25 टक्के रुग्ण उपचार घेत आहेत. 75 टक्के रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. त्यामध्ये यावल तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्के तर रावेर तालुक्याचे 70 टक्के आहे. तसेच जळगाव येथे यावल तालुक्यातील सात, तर रावेर येथील 63 असेच 70 रुग्ण उपचार घेत असल्याचेही डॉ.थोरबोले यांनी सांगितले.मंगळवार पर्यंतची माहिती देताना डॉ.थोरबोले यांनी सांगितले की, दोन्ही तालुक्यातील आतापर्यंत एकूण 3470 जणांनी स्वब दिले. त्यात यावल तालुक्यातील 1710, तर रावेर तालुक्यातील 1760 जणांचा समावेश आहे. त्यामध्ये पॉझिटिव म्हणून समोर आलेले यावल येथील 367, तर रावेर येथील 562 जणांचा असा एकूण 929 जणांचा समावेश आहे. तसेच निगेटिव्ह म्हणून यावल तालुक्यातील 1343, तर रावेर तालुक्यातील 1198 अशा एकूण 2541 जणांचा समावेश आहे. आजच्या घडीला एकही स्वॅब प्रलंबित नाही, तर तर दोन्ही तालुक्यातील कोरानाने मृत्यू झालेल्यांची संख्याही 64 आहे. त्यामध्ये यावल तालुक्यातील 26, तर रावेर तालुक्यातील 38 जणांचा समावेश आहे. हा मृत्युदर 6.9 टक्के इतका आहे.फैजपूरच्या आता केवळ तीन रूग्णांवर उपचार सुरूफैजपूर शहराची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. शहरात आतापर्यंत एकूण 69 बाधित रुग्ण आढळले होते. त्यापैकी 61 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर पाच रुग्ण मयत झाले आहेत. त्यामुळे आता केवळ तीन रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFaizpurफैजपूर