शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: अमळनेरातून पळाले यमराज; नियोजन अन् लॉकडाऊनचा 'पॉझिटिव्ह' परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 10:19 IST

नियोजन आणि लॉकडाउनचे परिणाम आता दिसू लागले आहेत.

- संजय पाटीलअमळनेर : गेल्या काही दिवसांपासून अमळनेर तालुक्यात असलेल्या यमराजने आपला मुक्काम हलवला आहे. सोमवारी एकही मृत्यू कोरोनाने झाला नाही. 1506 पैकी फक्त 18 जण पॉझिटिव्ह आले असून पॉझिटिव्हीटीची टक्केवारी फक्त 1.2 पर्यंत घसरल्याने तालुक्याला सकारात्मक दिलासा मिळाला आहे.कोरोनाच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या अंशतः लॉकडाऊनच्या पालनासाठी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनीदेखील नियोजनबद्ध कठोर पावले उचलून दररोज पालिकेमार्फत दंडात्मक कारवाई आणि दुकाने सील केली जात होती. त्यामुळे लालची व्यापाऱ्यांना धडा मिळाला तर नागरिकांनीदेखील सावधानता बाळगली.आरोग्य विभागातर्फे डॉ.प्रकाश ताळे , डॉ.गिरीश गोसावी, डॉ.विलास महाजन, डॉ.राजेंद्र शेलकर यांनी शिक्षक, अंगणवाडी सेविका , परिचारिका , आरोग्यसेवक यांचे पथक तैनात करून ट्रेसिंग , टेस्टिंग , ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा वापर केल्याने रुग्णांचे होमकोरोंटाईन वाढले परिणामी 26 रोजी शहरात 907 चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी 14 जण तर ग्रामीण भागात 599 चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी फक्त 4 जण पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्हीटीची टक्केवारी 20 वरून 1.2 वर घसरली.त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसात 276 जणांचा मृत्यू झाला होता दररोज कोविड रुग्णालयातून 6 ते 16 असे मृत्यू होत होते त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. योग्य नियोजन , वेळीच उपचार , सकारात्मक प्रेरणा यामुळे 26 रोजी 11 कोविड रुग्णालयातून आणि शहरातून देखील एकही रुग्णांचा मृत्यू झाला नाही त्यामुळे यमराज ने काढता पाय घेतल्याने दिलासा मिळाला आहे.रुग्णसंख्या आणि मृत्यू संख्या घटली असली तरी बेफिकिरी करून चालणार नाही. नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळून रिकामे फिरणे बंद करावे. वेळीच उपचार करून घ्यावेत. -सीमा अहिरे, इंसिडन्ट कमांडर, अमळनेर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmalnerअमळनेर