शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची परीक्षा रद्द केली; परीक्षा शुल्क कधी परत करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST

- स्टार : 723 लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना विषाणूचा कहर वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने दहावीची परीक्षा ...

- स्टार : 723

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना विषाणूचा कहर वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली आहे. या परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातील ५८ हजार ५१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांनी भरलेल्या परीक्षा शुल्कापोटी सुमारे २ कोटी ४२ लाख ८४ हजार ९७० रुपये राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे रक्कम जमा झाली आहे. परीक्षा रद्द झाल्याने भरलेल्या शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळणे अपेक्षित आहे. त्याबाबतच्या शिक्षण मंडळाच्या निर्णयाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्‍यमिक आणि उच्च माध्‍यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीच्या परीक्षेसाठी डिसेंबरपासून पुढे दोन महिने अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी नियमित, विलंब आणि अतिविलंब शुल्क, अशी मुदत होती. परीक्षा शुल्क हे प्रति विद्यार्थी ४१५ रुपये होते. परीक्षेचे वेळापत्रक सुध्दा जाहीर केले. पण, कोरोनाचा कहर थांबता थांबत नाही. दुसरीकडे बाधितांसह मृत्यूचे प्रमाणही वाढले. परिणामी, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाने कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द केली. त्यानुसार राज्य शिक्षण मंडळाने देखील निर्णय घेत दहावीची परीक्षा रद्द केली. ही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना हे शुल्क परत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय शासनाकडून झालेला नाही.

------------------------------------

जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा : ८५७

दहावीतील एकूण विद्यार्थी : ५८,५१८

प्रति विद्यार्थी परीक्षा शुल्क : ४१५

परीक्षा शुल्काची एकूण रक्कम : २,४२,८४,९७०

----------------------------------

पुढे काय होणार, विद्यार्थी संभ्रमात

परीक्षा रद्दचा निर्णय योग्य आहे. पण, पुढील प्रवेश प्रक्रिया कशी राबविणार याबाबत अजूनही शासनाने निर्णय घेतलेला नाही. हे शिक्षण विभागाने स्पष्ट करून आमचा संभ्रम दूर करावा.

- नेहा चंदेले, विद्यार्थिनी

--------------

दहावीचे अंतर्गत मूल्यमापन लवकर करावे. तसेच शिक्षण मंडळाने परीक्षा शुल्क परतीचा निर्णय सुध्दा लवकर घ्यावा. अकरावी प्रवेशासाठी कुठली प्रक्रिया राबविणार आहे. याबाबत माहिती त्यांनी लवकरात लवकर दयावी.

- आदिती भालेराव, विद्यार्थिनी

------------

अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार असेल, तर हरकत नाही. सीईटीच्या तयारीसाठी पुरेसा वेळ द्यावा. तसेच परीक्षा शुल्काची रक्कम सुध्दा विदयार्थ्यांना परत करण्यात यावी. कोरोनामुळे आधीच सर्वांची आर्थिंक परिस्थिती कोलमडली आहे.

- गणेश कोळी, विद्यार्थी

---------------------------

यंदा परीक्षार्थींची संख्या कमी

मागील वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी ६४ हजार ५० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मात्र, यंदा ही संख्या कमी असल्याची पहायला मिळाली. यंदा ५८ हजार ५१८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी शिक्षण मंडळाकडे अर्ज दाखल केले होते. बारावीसाठी मागील वर्षी ५९ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यंदा ४८ हजार ४०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. दरम्यान, बारावीची परीक्षा होणार की नाही, याबाबत कुठलीही स्पष्टता शासनाकडून करण्‍यात आलेली नाही.