शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘जखम मांडीला, उपचार शेंडीला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:14 IST

मंजूर निधी - ४२ कोटी एकूण कामे - १२८ रस्त्यांवर होणारा खर्च - १६ कोटी लोकमत न्यूज नेटवर्क ...

मंजूर निधी - ४२ कोटी

एकूण कामे - १२८

रस्त्यांवर होणारा खर्च - १६ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - अडीच वर्षांपुर्वी मिळालेल्या १०० कोटींपैकी ४२ कोटींवरील स्थगिती शासनाने उठविली आहे. यामुळे जळगावकरांच्या समस्या सुटतील अशा अपेक्षा होती, मात्र सत्ताधाऱ्यांचा कारभारामुळे ‘जगणे असह्य झालेल्या जळगावकरांचे मरण सुसह्य’ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. शहरातील मुख्य समस्या रस्त्यांची असताना, त्यावर केवळ १६ कोटींचे नियोजन केले गेले आहे. तर खुले भुखंड विकसीत करण्यासाठी तब्बल ८ कोटींचे नियोजन सत्ताधाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे ‘जखम मांडीला अन‌् उपचार शेंडीला’ अशीच पध्दत सत्ताधाऱ्यांनी अवलंबली असल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेला नगरोथ्थान अंतर्गत मिळालेल्या १०० कोटी रुपयांपैकी ४२ कोटींच्या कामांवरची स्थगिती शासनाने उठविली आहे. ४२ कोटी रुपयांमधून शहरातील १२८ कामांच्या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता मिळाली आहे. ४२ कोटी रुपयांमध्ये नागरिकांना त्रास सहन करावा लागत असलेल्या रस्त्यांची समस्या मार्गी लागेल अशीच अपेक्षा जळगावकरांना होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी ४२ कोटींपैकी १६ कोटी रुपयांमधून रस्त्यांचे डांबरीकरणाचे नियोजन केले आहे. मात्र, उर्वरित २६ कोटी रुपयांमध्ये अशा कामांचे प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी घेतले आहेत, की ज्या कामांमुळे सर्वसामान्य जळगावकरांच्या अडचणी मार्गी लागतील असे काहीही दिसून येत नाही.

१. स्मशान भूमी सुशोभिकरण, दुरुस्तीसाठी दीड कोटी

१२८ कामांमध्ये दीड कोटी रुपयांचे ५ कामे हे स्मशान भूमीची दुरुस्ती, सुशोभिकरण, शेड तयार करणे या कामांमध्येच खर्च करण्यात येणार आहेत.

२. ८ कोटींचा निधी केवळ चेनलिंग फेन्सिंगवर होणार खर्च

४२ कोटींमधून ८ कोटींचा निधी शहरातील खुल्या जागांना कुंपनभिंत व चेनलिंग फेन्सिंगच्या कामांवर खर्च केला जाणार आहे. यासह गटारीचे कामे खुल्या जागांचा विकास विकास करण्याचे कामे देखील मनपा प्रशासनाने हाती घेतले आहेत.

रस्त्यांवर खर्च होणार १६ कोटी

या रस्त्यांचा समावेश

१.दुध फेडरेशन ते सीटी कॉलनी

२. गणेश कॉलनी ते कोर्ट चौक दरम्यानचा रस्ता

३.निमखेडी शिवार ते तालुका पोलीस स्टेशनसमोरील रस्ता

४. जुनी जैन फॅक्टरी ते नवीन महामार्गापर्यंतचा रस्ता

५. नित्यानंदनगर ते मेहरुण मधील मुख्य रस्ता

६. काव्यरत्नावली चौक ते वाघ नगर

७.प्रजापत नगर, सोना नगर, सुनंदिनी पार्क मधील रस्ते

८.कालींका माता मंदिर ते जुना खेडी रोड

९. हरिश स्वीट मार्ट ते आयएमआर महाविद्यालय