शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एकाच गाडीचे पूजन करीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भवानी मातेचा जयघोष आणि हळद-कुंकवाच्या भंडाऱ्याची उधळण करीत दरवर्षी पिंप्राळा येथे भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भवानी मातेचा जयघोष आणि हळद-कुंकवाच्या भंडाऱ्याची उधळण करीत दरवर्षी पिंप्राळा येथे भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त मोठ्या जल्लोषात बारागाड्या ओढण्यात येतात; पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता एकाच गाडीचे पूजन करीत भवानी मातेचा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

सकाळी भगत हिलाल बोरसे यांच्यासह तीन ते चार ग्रामस्थांनी पिंप्राळ्यातील भवानी माता मंदिराला सुरुवातीला पाच प्रदक्षिणा घातल्या. भवानी मातेचे पूजन झाल्यानंतर पिंप्राळा उड्डाण पुलाजवळ एकाच गाडीचे पूजन भगत हिलाल बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर तलाठी कार्यालयापर्यंत पायी चालत येऊन उत्सवाची सांगता करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात आला. यात्रोत्सवाला ७२ वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी जिल्हाभरातून नागरिक हा उत्सव पाहण्यासाठी येतात. हा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्‍यात येतो. बारागाड्यांचा उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची प्रचंड गर्दी होते, तर लहान मुलांसाठी झोके लावण्यात येतात. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून असे कुठलेही चित्र पिंप्राळ्यात पाहायला मिळाले नाही.