शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपंचमीला सापाला पूजा, मग अन्य दिवशी सापांना सजा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST

(डमी १०३९) अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शेतकऱ्याचा मित्र असलेल्या सापाविषयी नागरिकांच्या मनात अनावश्यक भीती वाढत जात ...

(डमी १०३९)

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शेतकऱ्याचा मित्र असलेल्या सापाविषयी नागरिकांच्या मनात अनावश्यक भीती वाढत जात असून, नागपंचमीच्या दिवशी पूजा होणाऱ्या सापांना इतर दिवशी मात्र ठार मारले जात असते. तसेच हे प्रकार वाढतच जात असून, दर दिवसाला अनेक सापांचा मृत्यू होत आहे.

सापांबद्दल असलेल्या गैरसमजुतीमुळे व अनावश्यक भीतीमुळे शेतकऱ्यांचा मित्र असलेला साप आता शत्रूसारखा भासत आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात जमिनीमधून उष्णता निघाल्यावर व बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक साप हे नागरीवस्तीत शिरतात. साप हे थंड आणि दमट जागा शोधतात. त्यामुळे साप हे मानवी वस्तीत भक्ष्य आणि आसरा शोधण्यासाठी येतात, उन्हाळ्याच्या अखेरीस काही सापांचा प्रजननाचा काळ सुरू होत असतो त्यामुळे एकाच ठिकाणी दोन ते तीन सापदेखील आढळतात. मात्र, नागरिकांमधील असलेले सापांबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे.

जिल्ह्यात आढळणारे सापांचे प्रकार

विषारी

घोणस, मण्यार, फुरसे, नाग, हिरवा चापडा, मलबारी चापडा, सामान्य मांजऱ्या, हरणटोळ, फॉर्स्टनचा मांजऱ्या, तपकिरी हरणटोळ.

बिनविषारी

अजगर, मांडूळ, कवड्या, धामण, नानेटी, त्रावणकोर कवड्या, डुरक्या घोणस, गवत्या, वाळा, पहाडी तस्कर, कुकरी सर्प.

साप आढळला तर...

१. साप घरात आढळल्यास, न घाबरता शांत राहावे, आपल्या जवळील सर्पमित्रांना कळवावे.

२. सर्पमित्र येईपर्यंत त्याच्या हालचालीकडे बारकाईने लक्ष द्यावे.

३. लहान मुलांना, पाळीव प्राण्यांना सापापासून दूर ठेवावे, सापाजवळ जाण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करून नये अथवा जवळ जाऊन छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करू नये.

साप हा तर शेतकऱ्याचा मित्र

साप हा शेतकऱ्याचा मित्र समजला जातो. शेतात धान्याची नासाडी करणारे उंदीर खाण्याचे काम साप हा करत असतो. एकप्रकारे साप शेतकऱ्याची अप्रत्यक्षपणे मदतच करत असतो. मात्र, सापांबद्दल असलेले गैरसमज व सापांबद्दल असलेली भीती यामुळे सापाला अनेक जण शत्रूच समजतात.

कोट...

जिल्ह्यात आढळणारे ३० टक्केच साप हे विषारी असून, ७० टक्के साप हे बिनविषारी आहेत. मात्र, अनेक वेळा सर्पदंश झाल्यानंतर भीतीमुळेच अनेक वेळा मृत्यू होत असतात. सापांबद्दल अनावश्यक भीती न बाळगल्यास सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूत घट येऊ शकते. तसेच नागरिकांनी काही अंशी खबरदारीदेखील घेण्याची गरज असते.

-बाळकृष्ण देवरे, सर्पमित्र