शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात बळीराजाला आता रब्बी हंगामाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:27 IST

तीन मोठे धरण वगळता सर्व जलसाठय़ांमध्ये बिकट स्थिती : केवळ 61 टक्के पाऊस, भरपावसाळ्य़ातही 36 गावांना 18 टँकरने पाणीपुरवठा

ठळक मुद्देरब्बीचा हंगाम कसा येणार ?जिल्ह्यातील पश्चिम भागात भीषण परिस्थिती36 गावांमध्ये 18 टँकर

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13 - जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी सर्वाच्या चिंता वाढल्या आहे. सोबतच जिल्ह्यातील तीन मोठे धरण वगळता इतर जलसाठय़ात पुरेसे पाणी नसल्याने रब्बी हंगाम धोक्यात येण्याच्या चिंतेने बळीराजा हवालदिल झाला आहे.  गेल्या वर्षी परतीच्या पावसामुळे धरणसाठय़ात मोठी वाढ झाली होती. यामुळे पावसाची तूट भरून निघण्यासाठी सर्व मदार आता परतीच्या पावसावर आहे.जिल्ह्यात भरपावसाळ्य़ाच्या महिन्यात 36 गावांना 18 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक अमळनेर तालुक्यात 23 गावांना 10 टँकरने तर जामनेर तालुक्यात सात गावांना 4 टँकर, बोदवड, पारोळा तालुक्यात प्रत्येकी दोन गावांना एक-एक टँकर तसेच जळगाव व भुसावळ तालुक्यात प्रत्येकी एका गावाला एक-एक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 94 गावांमध्ये 93 विहिरींचे अधिग्रहणटँकरने पाणीपुरवठय़ासह जिल्ह्यात 94 गावांमध्ये 93 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक अमळनेर तालुक्यात 35 गावांमध्ये 35 विहिरींचे अधिग्रहन करण्यात आले आहे. या सोबतच जिल्ह्यातील 10 गावांमध्ये 8 ठिकाणी तात्पुरती पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. अनेक प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठाजिल्ह्यातील अनेक मध्यम प्रकल्पांमध्ये जलसाठा नसल्याने प्रशासनाची चिंता वाढणार आहे. अगAावती, हिवरा, बहुळा, भोकरबारी, बोरी, मन्याड या प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. तर अंजनी प्रकल्पात  4 टक्के जलसाठा आहे. मात्र  हतनूर, वाघूर व गिरणा या मोठय़ा प्रकल्पांमध्ये  समाधानकारक जलसाठा असल्याने तेवढीच एक समाधानाची बाब शेतक:यांसाठी आहे.   

जिल्ह्यातील पश्चिम भागाकडील अमळनेर, भडगाव व पाचोरा या तालुक्यांमध्ये पावसाअभावी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यात अमळनेर व भडगाव तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 50 टक्क्याहून कमी पाऊस झाला आहे. हीच परिस्थिती पूर्वेकडील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातदेखील आहे.  सर्वात कमी 43.1 टक्के पाऊस मुक्ताईनगर तालुक्यात झाला आहे.  परतीच्या पावसाची वेळ आली तरी जिल्ह्यात अद्याप सरासरीच्या 61 टक्के पाऊस झाला आहे. 

एक तर पाऊस कमी व त्यात जलसाठय़ांचीही बिकट स्थिती, यामुळे रब्बी हंगामाला पाणी कसे उपलब्ध करावे, या चिंतेत बळीराजा आहे. आता सर्व आशा या महिन्यातील परतीच्या पावसाकडून असल्याचे बळीराजाचे म्हणणे आहे.