शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात व्याघ्र परिषदेत वाघांचा अधिवासाबाबत चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 17:32 IST

जिल्ह्यातील वाघांचा अधिवास असल्याचे अनेकदा सिद्ध झाल्याने त्यांचे संरक्षण करण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्था व पर्यावरणवाद्यांनी एकत्रित येवून, लोकप्रतिनीधींवर येथील वाघ वाचविण्यासाठी दबाव आणण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसंरक्षित वनक्षेत्रे हीच खरी मंदिरेव्याघ्र संरक्षणाची मोहिम आता गावपातळीपर्यंत पोहचावीलोकप्रतिनीधींवर येथील वाघ वाचविण्यासाठी दबाव आणण्याची गरज

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.९-जिल्ह्यातील वाघांचा अधिवास असल्याचे अनेकदा सिद्ध झाल्याने त्यांचे संरक्षण करण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्था व पर्यावरणवाद्यांनी एकत्रित येवून, लोकप्रतिनीधींवर येथील वाघ वाचविण्यासाठी दबाव आणण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करण्याची गरज असल्याचे मत व्याघ्र परिषदेत सहभागी व्याघ्र प्रेमींनी व्यक्त केले.

वसुंधरा चित्रपट महोत्सवातंर्गत पर्यावरण शाळेतर्फे शनिवारी नूतन मराठा महाविद्यालयातील डॉ.जगदिशचंद्र बोस सभागृहात व्याघ्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातपुडा फाउंडेशनचे अध्यक्ष व व्याघ्र अभ्यासक किशोर रिठे, यावल वनक्षेत्राच्या अधिकारी आश्विनी खोडपे, चंद्रपूर येथील व्याघ्र अभ्यासक बंडू धोत्रे, जळगाव येथील पर्यावरण तज्ज्ञ अभय उजागरे, वसुंधरा महोत्सवाचे संयोजक राजेंद्र नन्नवरे आदी उपस्थित होते. व्याघ्र परिषदेचे उदघाटन सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

संरक्षित वनक्षेत्रे हीच खरी मंदिरेकिशोर रिठे म्हणाले की, संरक्षण वनक्षेत्राचे जाळे वाढणे गरजेचे आहे. लोकप्रतिनीधींनी देखील संरक्षित वनक्षेत्राचे महत्व जाणून घेणे गरज असून, संरक्षित वनक्षेत्र हेच खरे मंदिर असून, भविष्यातील रामावर जर का वनवास भोगण्याची वेळ आली. तर हीच वनक्षेत्र त्या रामाचे मंदिर राहणार आहे.

व्याघ्र संरक्षणाची मोहिम आता गावपातळीपर्यंत पोहचावीव्याघ्र संरक्षणाची मोहिम आता गावपातळीपर्यंत नेण्याची गरज आहे. ज्या भागात वाघ आढळून येत आहे. त्या भागात काम करण्याची गरज आहे.  तसेच स्वच्छ भारताची मोहिम जी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. ती मोहिम आता वनक्षेत्रांमध्ये देखील राबविण्याची गरज असल्याचे मत रिठे यांनी व्यक्त केले.