शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

संघटनेसाठी काम न करणाऱ्यांचे तिकिट कापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 10:54 IST

महानगरच्या बैठकीत व्यक्त झाली भावना

ठळक मुद्दे६१ पैकी ३४ नगरसेवक उपस्थित

जळगाव : ‘ज्यांनी संघटनेसाठी काम केले नाही, त्यांचे तिकीट कापले’ अशी भावना रविवारी बळीराम पेठेतील भाजपा कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर महानगरच्या पदाधिकारी व नगरसेवकांच्या झालेल्ळा बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीत आमदार स्मिता वाघ यांना जळगाव मतदार संघातर्फे उमेदवारी जाहीर झाल्यानंतरची त्यांच्या उपस्थितीत ही पहिलीच सभा होती.खासदार निष्क्रीय असल्याचा ठपका लागू देणार नाही-स्मिता वाघशहराच्या विकासाच्या दृष्टीने जे काही होवू शकेल त्यासाठी नेहमी प्रयत्न करण्याची तयारी राहणार असून, तुमच्यावर आपला खासदार निष्क्रीय असल्याचा आरोप करण्याची कधीही वेळ येवू देणार नाही, अशी ग्वाही भाजपाच्या जळगाव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ यांनी भाजपाच्या जळगाव महानगरच्या पदाधिकाऱ्यांना दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जाणाºया या निवडणुकीत पहिल्यादांच महिलेला जळगाव लोकसभा मतदार संघासाठी संधी देण्यात आली असून, हा सर्व महिलांचा सन्मान असल्याचे वाघ यांनी सांगितले.बैठकीला महानगराध्यक्ष व शहराचे आमदार सुरेश भोळे, मनपा स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, मनपा गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी यांच्यासह नगरसेवक, मंडळप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व पदाधिकाºयांची उपस्थिती होती.वाद-विवाद विसरून काम करा - सुरेश भोळेआमदारांशी किंवा इतर नगरसेवकांशी जे काही वाद विवाद असतील ते विसरून आता महिनाभर पक्षासाठी काम करण्याचे आवाहन महानगरप्रमुख व आमदार सुरेश भोळे यांनी बैठकीत केले.शिवसेनेशी आपली युती असून, शिवसेनेचे नगरसेवक व मनपा निवडणुकीत पराभूत उमेदवारांना सोबत घेवून आपल्याला काम करण्याची गरज असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले.म्हणून तिकीट कापलेपक्ष हा सर्वोच्च असतो, पक्षाचे काम करणे हे सर्व पदाधिकाºयांचे काम असून, ज्या खासदारांनी संघटनावाढीसाठी काम केले नाही. अशा खासदारांचे तिकीट यंदा कापण्यात आल्याचे मनपाचे उपगटनेते राजेंद्र घुगे पाटील यांनी सांगितले. त्यांच्या वक्तव्यानंतर बैठकीत शांतता पसरली होती. त्यानंतर घुगे-पाटील यांना आपण काय बोलले हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवा-सारव करण्याचा प्रयत्न केला.६१ पैकी ३४ नगरसेवक उपस्थितदरम्यान, भाजपाच्या या बैठकीत मनपातील ६१ नगरसेवकांपैकी ३४ नगरसेवक उपस्थित होते. महापौर व उपमहापौरांसह इतर नगरसेवक या बैठकीला उपस्थित नव्हते.

टॅग्स :Politicsराजकारण